Shraddha Murder Case: “नॉनव्हेज खात नसल्याने आफताब मारायचा, श्रद्धाने तीनदा मदत मागितली होती”; मैत्रिणीचा नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 04:34 PM2022-11-20T16:34:03+5:302022-11-20T16:34:52+5:30
Shraddha Murder Case: आफताबच्या आई-वडिलांच्या बोलण्यात श्रद्धा आली नसती तर आज ती जिवंत असती, असा दावा मैत्रिणीने केला आहे.
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, दररोज नवनवीत खुलासे होताना दिसत आहेत. श्रद्धाची मदत करणाऱ्या एका मैत्रिणीने आफताब श्रद्धाला कोणकोणत्या कारणांवरुन मारहाण करत होता, याबाबत नवीन गोष्ट सांगितली आहे.
पूनम बिडलान असे या मैत्रिणीचे नाव असून, श्रद्धाच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने सांगितल्या. श्रद्धा आणि आफताब एव्हर शाइन भागात राहायला आले होते. त्या दरम्यान श्रद्धा त्यांच्याकडे तीनदा मदत मागण्यासाठी आली होती. एकदा पूनमनेही श्रद्धासोबत तुळींज पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एफआयआर नोंदवण्याची तयारी करण्यात आली. श्रद्धाही तयार होती. आफताब ज्यावेळी श्रद्धाला मारहाण करत असे, त्या रात्री घरी येत नसे. तर आई-वडिलांकडे जात असे. त्यानंतर आई-वडील श्रद्धाची समजूत काढत असत आणि श्रद्धाही आफताबच्या आई-वडिलांच्या बोलण्याला बळी पडायची, असे पूनमने म्हटले आहे.
नॉनव्हेज खायला बळजबरी करायचा
एकदा श्रद्धा त्याच्याकडे आली, तेव्हा तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाण केल्याच्या खुणा होत्या. एवढेच नाही तर त्याच्या मानेवर कोणीतरी त्याचा गळा दाबल्याच्या खुणा होत्या. याबाबत श्रद्धाने सांगितले की, आफताबने तिला खूप मारहाण केली. पळून आले नसते, तर त्याने तिचा जीव घेतला असता. त्यादिवशी झालेल्या भांडणाचे कारण त्याहून आश्चर्यकारक होते. नॉनव्हेज खाण्यास नकार दिल्याने आफताबने त्याला मारहाण केली होती. आफताब तिला नॉनव्हेज खायला बळजबरी करायचा. नॉनव्हेज खाल्ले नाही की, तो तिला मारहाण करायचा, असेही पूनमने सांगितले.
दरम्यान, आफताबचे आई-वडील श्रद्धाकडे यायचे आणि तिला तिच्या मुलाची चूक विसरून त्याला माफ करण्याची विनंती करत असत. ते लोक इतके प्रेमाने बोलायचे की ती मान्य करायची. श्रद्धा आई-वडिलांच्या बोलण्यात आली नसती तर आज ती जिवंत असती, असे सांगत आफताबच्या आई-वडिलांनी त्याला सातत्याने पाठिशी घातले, असा आरोपही पूनमने केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"