Shraddha Murder Case: “कांदबरी अन् साहित्याची पुस्तके वाचायची आहेत”; आफताबची तिहार तुरुंग प्रशासनाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:19 PM2022-12-03T21:19:18+5:302022-12-03T21:20:04+5:30
Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात दररोज नवनवे खुलासे होत असून, धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणात दररोज नवनवे खुलासे आणि माहिती समोर येत आहे. पोलिस आरोप आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे. यातच आफताबने आता तिहार तुरुंग प्रशासनाकडे पुस्तके वाचण्याची मागणी केली आहे. याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे केलेले हत्यार पोलिसांना अखेर सापडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीत आफताबने चायनीज चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात प्रथम तिच्या हाताचे तुकडे केले होते. नार्को टेस्टमध्ये त्याने तुकडे फेकून दिल्याचे सांगितले. पोलीस आता त्या लोकेशनवर जाऊन हत्याराचा शोध घेत आहेत. यातच आफताबने पुस्तके वाचण्याची मागणी केली आहे.
कांदबरी आणि साहित्याची पुस्तके वाचायची आहेत
आफताबाने तुरुंगात वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी प्रशासनास केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आफताबला द ग्रेट रेल्वे बाजार नावाची कादंबरी वाचायला दिली जाऊ शकते.
Shraddha murder case | Accused Aftab has asked the Tihar administration to provide novels and literature books to read. The administration will soon provide him with the books: Tihar Jail Sources
— ANI (@ANI) December 3, 2022
दरम्यान, नार्को चाचणीदरम्यान आफताबने डॉक्टरांच्या टीमला सांगितले की, श्रद्धाने आपल्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. यामुळे तो संतापला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. याशिवाय आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कसे केले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली हेही सांगितले. डॉक्टरांनी आफताबला विचारले की त्याने श्रद्धाचे शिर कुठे लपवले आहे, तेव्हा तो ते ठिकाण सांगू शकला नाही. शिर नक्की कुठे लपवले होते हे त्याला आठवत नव्हते. आफताबचे जबाब हे पोलीस आणि पॉलीग्राफ चाचणीत झालेले खुलासे यांच्याशी जुळत असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"