Shraddha Walker Murder Case: बुकवर एन्ट्री नाही, फक्त आधारकार्डची झेरॉक्स दिली; हॉटेल मालकाला आफताबने ७२० अन् श्रद्धाने ८७० रुपये पाठवले!

By मुकेश चव्हाण | Published: November 27, 2022 12:53 PM2022-11-27T12:53:59+5:302022-11-27T12:54:11+5:30

Shraddha Walker Murder Case: श्रद्धाची हत्या करण्याआधी आफताब तिला हिमाचल प्रदेशात घेऊन गेला होता.

Shraddha Walker Murder Case: No entry on book, only xerox of Aadhaar card given; Aaftab sent Rs 720 and Shraddha Rs 870 to the hotel owner! | Shraddha Walker Murder Case: बुकवर एन्ट्री नाही, फक्त आधारकार्डची झेरॉक्स दिली; हॉटेल मालकाला आफताबने ७२० अन् श्रद्धाने ८७० रुपये पाठवले!

Shraddha Walker Murder Case: बुकवर एन्ट्री नाही, फक्त आधारकार्डची झेरॉक्स दिली; हॉटेल मालकाला आफताबने ७२० अन् श्रद्धाने ८७० रुपये पाठवले!

googlenewsNext

नवी दिल्ली: जंगलात पोलिसांना सापडलेली हाडे श्रद्धा वालकर हिचीच असल्याचे न्यायसहायक प्रयोगशाळेतील डीएनए तपासणीत सिद्ध झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोपी आफताबला शनिवारी  दिल्लीच्या न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली. आफताबला डॉ. आंबेडकर रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. रुग्णालयातूनच त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने न्यायालयात हजर करण्यात आले होते.

श्रद्धाची हत्या करण्याआधी आफताब तिला हिमाचल प्रदेशात घेऊन गेला होता. यावेळी श्रद्धाने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते.यावेळी आफताब आणि श्रद्धाने काही ट्रान्झॅक्शन केले होते. त्याचे डिटेल्स पोलिसांना मिळाले आहेत. हिमाचलमधील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या कसोलपासून ३० किलोमीटर अंतरावर आफताब आणि श्रद्धाने हॉटेल बुक केले होते. यावेळी आफताबने हॉटेल मालकाला त्याच्या आधारकार्डची फक्त झेरॉक्स दिली होती. 

'मला आफताबने बोलावलेलं', ती मुलगी मानसशास्त्रज्ञ निघाली; श्रद्धाच्या मृत्यूनंतर आली होती घरी!

हॉटेल घेताना आपण जी एन्ट्री करतो, ती मात्र त्याने केली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या हॉटेलमध्ये दोन दिवसाचा मुक्काम दोघांनी केला होता. जेव्हा ते दिल्लीसाठी रवाना झाले, तेव्हा दोघांनी मिळून हॉटेल मालकाला रुमचे भाडे ऑनलाइन पद्धतीने दिले होते.  श्रद्धाने हॉटेल मालकाच्या खात्यात ८७० रुपये आणि आफताबने ७२० रुपये ट्रान्सफर केले. 

दरम्यान, हत्येनंतर आफताबने एका डॉक्टर मुलीला आपल्या घरी डेटवर बोलावले होते, अशी माहिती समोर आली आहे. बम्बल डेटिंग ॲपवर यांची ओळख झाली होती. श्रद्धासोबतही त्याची ओळख याच ॲपवर झाली होती. ही डॉक्टर मुलगी घरी आली तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्येच होते. या डॉक्टर मुलीला दिल्ली पोलिसांनी शोधून काढले असून ती मानसोपचार तज्ज्ञ असल्याचे कळते.

सीबीआय चौकशीची पित्याची मागणी-

श्रद्धाच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आफताब हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी. श्रद्धाच्या हत्येत आफताबचा परिवारही सहभागी आहे. त्याच्या कारवाया त्याच्या आई-वडिलांना माहीत होत्या. तो श्रद्धाला मारहाण करतो, हे त्यांना माहीत होते. त्यांनी याची माहिती मला द्यायला हवी होती. तथापि, त्यांनी तसे केले नाही. त्याचे आई-वडीलही हत्येत सहभागी होते, हे मी दाव्यासह सांगतो. हत्येचे संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Shraddha Walker Murder Case: No entry on book, only xerox of Aadhaar card given; Aaftab sent Rs 720 and Shraddha Rs 870 to the hotel owner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.