मोहाडीत श्रीकृष्ण जन्मोत्सव यात्रेस शनिवारपासून सुरुवात
By admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:47+5:302015-09-03T23:05:47+5:30
मोहाडी : येथे अष्टबाहू गोपालकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाडमल्ल व कानिफनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त, कर्मयोगी एकनाथभाऊ प्रतिष्ठान, मोहाडी आयोजित भागवत वाचन व्याख्यानमाला कीर्तन, उत्सव अशा विविध अंगांनी मोहाडीत (ता. दिंडोरी) श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत असून या यात्रोत्सवाची सुरुवात दि. ५ सप्टेंबरपासून होत आहे.
Next
म हाडी : येथे अष्टबाहू गोपालकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाडमल्ल व कानिफनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त, कर्मयोगी एकनाथभाऊ प्रतिष्ठान, मोहाडी आयोजित भागवत वाचन व्याख्यानमाला कीर्तन, उत्सव अशा विविध अंगांनी मोहाडीत (ता. दिंडोरी) श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत असून या यात्रोत्सवाची सुरुवात दि. ५ सप्टेंबरपासून होत आहे.रात्री १२ वा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत आहे. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे काल्याचे कीर्तन होईल. दि. ६ रोजी पहाटे मंत्रजागर पूजा, महाआरती आदि कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर, मोहाड मल्ल मंदिरात होत असून दु. ३ वा. कानिफनाथ महाराजांची मिरवणूक होईल. या पूजेचा मान पुजारी किसन आबा जाधव यांचे हस्ते तर मोहाड मल्ल मंदिरात अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते विधिवत महापूजा होईल. ४ वा. बालकुस्ती स्पर्धा, ६ वा. सार्वजनिक दहीहंडी कार्यक्रम होईल, दहीहंडी फोडण्याचा मान श्री बाकेराव मौले यांना देण्यात येतो. दि. ७ सप्टेंबर रोजी भव्य कुस्ती स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू हजेरी लावतात. चौकटअष्टबाहू श्रीकृष्णमूर्तीश्रीकृष्णाची अष्टबाहू मूर्ती भारतात असून अखंड शालीग्रामात कोरलेली आहे.एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलून धरलेला आहे. दोन हातात गाईंना मुग्ध करणारी मुरली आहे. इतर हातात चक्र, गदा ही आयुधे आहेत. प्रभूच्या चरणकमलाजवळ दोन गोपी असून एक मृदुंग वाजवित आहे व दुसरा सनई वाजवित अहे. प्रभूच्या अंगास कालियाने विळखा घातला असून कानास दंश करीत आहे, सवत्स गाई प्रभूच्या चरणकमलाजवळ आहे. कमरेस लंगोट असून त्यावर दागिना दाखविला आहे.