श्री राधे डेअरीने १०० कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला; २०२६ पर्यंत १ हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 03:38 PM2023-04-29T15:38:16+5:302023-04-29T15:39:27+5:30

२०१५-१६ साली १.२५ कोटी रुपयांच्या उलाढालीसह कंपनीची सुरुवात.

shree radhe dairy hits rs 100 crore turnover mark and target to cross the 1000 crore mark by 2026 | श्री राधे डेअरीने १०० कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला; २०२६ पर्यंत १ हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य

श्री राधे डेअरीने १०० कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला; २०२६ पर्यंत १ हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य

googlenewsNext

गुजरातमधील सुरत येथे असलेल्या श्री राधे डेअरीने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा साध्य केला आहे आणि २०२६ पर्यंत तिची उलाढाल १,००० कोटी रुपयांच्यावर जाण्याची अपेक्षा आहे. ही प्रभावी कामगिरी समर्पण भाव आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचे परिणाम आहे. कंपनी रसायने आणि संरक्षक द्रव्य विरहित, उच्च दर्जाचे आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले तूपाचे उत्पादन घेत आली आहे. 

गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप तयार करण्याच्या पारंपारिक पद्धती आणि तिच्या वापरावर कंपनीची ठाम धारणा आहे. हे तूप फ्लेवर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह मुक्त आहे याची खात्री करण्यावर कायम भर राहिला आहे. गुणवत्तेबद्दलच्या या वचनबद्धतेमुळे कंपनीला एक निष्ठावान ग्राहक आधार तयार करण्यात आणि हा उल्लेखनीय टप्पा गाठण्यास मदत झाली आहे. उचित प्रणाली, मानवता आणि योगदान ही त्रिसूत्री कंपनीच्या डीएनएमध्ये उपजतच आहे. २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनीचा महसूल १०० पट वाढला आहे आणि सरलेल्या आर्थिक वर्षात जवळपास दुप्पट, म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षातील ५४ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत तो १०० कोटींवर पोहोचला आहे.

शेतकरी कुटुंबातून येऊन मोठी उलाढाल

श्री राधे डेअरीचे संस्थापक आणि अध्यक्ष भूपत सुखाडिया हे शेती असणाऱ्या कुटुंबातून आले आहेत. ते एका डेअरी प्रकल्पामध्ये २,५०० रुपयांच्या पगारासह उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करत होते. बाजारातील बारकावे समजून घेण्यासाठी, त्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन काम  करायचे होते, परंतु त्याची ही विनंती नाकारण्यात आली. यातून स्वतःचा उपक्रम सुरू करण्यास ते प्रवृत्त झाले. त्यांनी सूरतमध्ये ३५० चौरस फुटांच्या छोट्याशा दुकानापासून सुरुवात केली आणि १८ महिन्यांनंतर तुपाचा व्यापार सुरू केला. स्वतःची दुग्ध उत्पादन सुविधा सुरू करण्याचा विचार त्यांनी सुरू केला, ज्यामुळे २०१५ मध्ये श्री राधे डेअरीचा (वास्तू डेअरी म्हणून प्रसिद्ध) जन्म झाला. प्रणाली-चालित संस्थेवर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांच्या इकोसिस्टमचा भाग असलेल्या प्रत्येकाच्या विकासात या माध्यमातूनच योगदान दिले जाईल, असाही त्यांचा विश्वास आहे.

भविष्यात आणखी नवनवीन टप्पे गाठण्यास उत्सुक

हा टप्पा गुणवत्ता आणि ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्या वचनबद्धतेची पुष्टी आहे. भविष्याकडे पाहत असताना, आपल्यापुढील संधी आणि आव्हानांबद्दल आपण उत्सुक असतो. आमचा समर्पित संघ, निष्ठावंत भागीदार आणि ग्राहक यांच्या पाठिंब्याशिवाय हा टप्पा गाठणे शक्य झाले नसते. आम्ही सीमांना पुढे ढकलण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत आणि आम्ही नजीकच्या भविष्यात आणखी नवनवीन टप्पे गाठण्यास देखील उत्सुक आहोत, असे कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष, भूपत सुखाडिया यांनी सांगितले. 

अग्रगण्य शुद्ध तूप उत्पादक आणि पुरवठादार बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट 

भविष्यातील योजनेमध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोच वाढवणे, त्यांच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करणे आणि ग्राहकांची संख्या वाढवणे यांचा समावेश आहे. त्यांच्या पद्धती पारंपारिक असल्या तरी त्यांचा दृष्टिकोन अपारंपरिक आहे. संस्थेने वैज्ञानिक पद्धतींद्वारे पॅकेजिंग, वितरण, सुरक्षा मापदंड आणि बरेच काही नवीन तंत्रे स्वीकारली आहेत. भारतातील अग्रगण्य शुद्ध तूप उत्पादक आणि पुरवठादार बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, श्री राधे डेअरी फार्म अँड फूड्स लिमिटेडचे मुख्यालय सुरत, गुजरात, भारत येथे आहे. कंपनीची स्थापना 2015 मध्ये भूपत सुखाडिया यांनी गायींची काळजी घेणे आणि रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून केली होती. कंपनी दूध आणि दुधावर आधारित उत्पादने प्रामुख्याने रसायनमुक्त तूप तयार करण्याचा व्यवसाय करत आहे. सुरतजवळील पिपोदरा येथे उत्पादन सुविधा ७५ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेली आहे आणि त्यात २५० हून अधिक कर्मचारी आहेत. ८ वर्षांच्या अल्प कालावधीत, कंपनीने २२०० हून अधिक वितरक आणि २ लाखांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या नेटवर्कसह वास्तू, वास्तु गोल्ड आणि गोशाळा या ब्रँड्ससाठी पॅन इंडियाची झपाट्याने वाढ केली आहे. ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी डेअरी एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे ज्याची उलाढाल २०१५ मध्ये १.२५ कोटींवरून २०२३ मध्ये १०० कोटीपर्यंत वाढली आहे. गाय तूप, देशी तूप, A2 तूपाची संपूर्ण श्रेणी केवळ स्टोअरमध्येच उपलब्ध नाही, तर ती देखील उपलब्ध आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: shree radhe dairy hits rs 100 crore turnover mark and target to cross the 1000 crore mark by 2026

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.