बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 04:27 PM2022-12-29T16:27:02+5:302022-12-29T16:35:29+5:30

नितीश भारद्वाज हे बुधवारी जयपूरमध्ये होते, एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं

Shri Krishna in Mahabharata nitish bharadwaj also got angry due to the color in Besharam song, said... | बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...

बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...

Next

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा ‘पठाण’ ( Pathaan) हा सिनेमा वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याची. ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आणि हिंदू संघटना याविरोधात रस्त्यावर उतरल्या. हा हिंदू धर्माचा अपमान आहे, असं म्हणत या संघटनांनी शाहरूखच्या ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं. आता, महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका केलेल्या नितीश भारद्वाज यांनीही या रंगावरुन आक्षेप घेतला आहे. 

नितीश भारद्वाज हे बुधवारी जयपूरमध्ये होते, एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी, त्यांनी पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यावर आणि त्यातील भगव्या रंगाच्या बिकनीवर भाष्य केलं. रायटर, प्रोड्युर आणि डायरेक्टरची एक सामाजिक जबाबदारी असते. समाजातील लोकांच्या भावना दुखावतील असे कुठलेही कृत्य केलं नाही पाहिजे किंवा एखाद्या समाजाच्या संस्कृतीवर आघात होईल, असे कृत्य करता कामा नये. मी ते गाणं पाहिलं नाही, पण गोपलजी यांनी व्यासपीठावरुन जे सांगितलं त्यावरुन एवढच म्हणेन की, जर कोणी हिरव्या रंगाला बेशरम रंग म्हटलं तर योग्य वाटेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

हिरवा रंग इतरही कुठल्या तरी गोष्टीचा प्रतिक आहे. एका विशिष्ट समाजाचा प्रतिक आहे. आमच्यासाठी हिरवा रंग हा निसर्गाचे रुप आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजामध्येही हिरवा रंग आहे, तसेच भगवाही रंग आहे. त्यामुळेच, या रंगाने चुकीच्या पद्धतीने दाखवणे चुकीचं आहे, असे नितीश यांनी म्हटले.  

पठाण चित्रपटात अन् गाण्यात होणार बदल

दरम्यान, आता पठाण चित्रपटात आणि गाण्यात निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने काही बदल सूचवले आहेत. “सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी पठाण हा चित्रपट सीबीएफसी एक्झॅमिनेशन कमिटी फॉर सर्टिफिकेशनकडे पोहोचला आहे,” अशी माहिती सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिली. सीबीएफसीच्या कमिटीनं निर्मात्यांना सुधारित आवृत्ती बोर्डाकडे पाठवण्यापूर्वी चित्रपटात आणि गाण्यांमध्ये सूचवण्यात आलेले बदल करण्यास सांगितल्याचंही ते म्हणाले.

२५ जानेवारीला प्रदर्शित

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख तब्बल चार वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

Web Title: Shri Krishna in Mahabharata nitish bharadwaj also got angry due to the color in Besharam song, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.