श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 07:47 PM2024-01-14T19:47:25+5:302024-01-14T19:48:43+5:30

लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव त्यांच्या दाव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Shri Ram will not come to Ayodhya, he himself came in my dream and said; Tej Pratav's claim | श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा

श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा

Ram Mandir: आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. कधी ते कृष्णाच्या रुपात दिसतात, तर कधी सायकलवरुन मंत्रालयात पोहोचतो. यातच आता त्यांनी श्रीराम मंदिराबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. श्रीराम यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितले की, ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत येणार नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत मंत्री तेज प्रताप यादव म्हणाले, रामजी 22 जानेवारीला अयोध्येत येणार नाहीत. माझ्या स्वप्नात स्वतः रामजी आले होते. ते म्हणाले की, ही सगळी नाटकं सुरू आहेत. त्यामुळे रामजी अयोध्येत येणार नाहीत. निवडणुका आल्या की मंदिर पुढे येते. निवडणुका संपल्या की, मंदिराला कुणी विचारत नाही, अशी टीकाही तेज प्रताप यांनी यावेळी केली. 

भगवान श्रीकृष्ण स्वप्नात आले
बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप त्यांच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखले जातात. कधी ते कृष्णाच्या रुपात दिसतात, तर कधी सायकलवरून मंत्रालयात पोहोचतो. एवढंच नाही तर ते अनेकदा त्यांच्या स्वप्नांचाही उल्लेख करत असतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तेज प्रताप यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते झोपलेले दिसत आहेत आणि यावेळी त्यांना स्वप्नात भगवान श्रीकृष्णाच्या विराट रुपाचे दर्शन होते. 

मुलायम सिंहही स्वप्नात आले
तेज प्रताप जेव्हा सायकलवरुन त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, त्यांना सकाळी झोपेत स्वप्न पडले आणि स्वप्नात मुलायम सिंह स्वप्नात आले. मुलायम सिंह यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा केली आणि त्यांना मिठीही मारली. आम्ही दोघांनी खुपवेळ सायकल चालवली. यामुळेच मला सायकलवरुन कार्यालयात येण्याची प्रेरणा मिळाली.

Web Title: Shri Ram will not come to Ayodhya, he himself came in my dream and said; Tej Pratav's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.