IRCTC: आता 'रामायण एक्स्प्रेस' धावणार, प्रवाशांना घेता येणार भजन-कीर्तनाचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:39 PM2020-02-20T15:39:39+5:302020-02-20T15:44:17+5:30

'रामायण एक्स्प्रेस' प्रवाशांना भगवान रामाच्या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

Shri Ramayana Express to run from 28 March : IRCTC | IRCTC: आता 'रामायण एक्स्प्रेस' धावणार, प्रवाशांना घेता येणार भजन-कीर्तनाचा आनंद!

IRCTC: आता 'रामायण एक्स्प्रेस' धावणार, प्रवाशांना घेता येणार भजन-कीर्तनाचा आनंद!

Next
ठळक मुद्दे या ट्रेनचे नाव 'रामायण एक्स्प्रेस' असे भारतीय रेल्वेने ठेवले आहे. या ट्रेनची थीम रामायणावर आधारित आहे.ट्रेनमध्ये भजन आणि किर्तनाच्या ऑडिओ व व्हिडीओची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे होळी सणानंतर एक विशेष ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. या ट्रेनची थीम रामायणावर आधारित आहे. या ट्रेनचे नाव 'रामायण एक्स्प्रेस' असे भारतीय रेल्वेने ठेवले आहे. तसेच, ही 'रामायण एक्स्प्रेस' भगवान राम संबंधीत स्थानकांना जोडली जाणार आहे. भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी 'रामायण एक्स्प्रेस' प्रवाशांना भगवान रामाच्या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

आयआरसीटीसीकडून (IRCTC ) मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण एक्स्प्रेस'  होळी सणानंतर म्हणजेच 28 मार्चनंतर सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी यासंबंधी ट्रेनची माहिती देताना सांगितले होते की, या ट्रेन अशा डिझाइन करण्यात येत आहे की, प्रवाशांना तीर्थयात्रांचा अनुभव घेता येईल. ट्रेनमध्ये भजन आणि किर्तनाच्या ऑडिओ व व्हिडीओची व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, 'रामायण एक्स्प्रेस' ही नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृंगपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी आणि रामेश्वर अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. मात्र, यासंबंधी अद्याप संपूर्ण माहिती रेल्वेकडून मिळू शकली नाही. 

एक्स्प्रेसमधील सीटला दिले मंदिराचे रूप
वाराणसी ते इंदूरदरम्यान सुरू झालेल्या काशी महाकाल एक्स्प्रेसमधील एका सीटला मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. या मंदिरात भगवान शिवाची मूर्ती लावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारीला आपल्या वाराणसी दौऱ्यादरम्यान या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. ज्या डब्यात हे मंदिर बनविले आहे, त्याचे फोटोही समोर आले आहे. काशी महाकाल एक्स्प्रेसच्या B-5 या डब्यात 64 नंबरची सीट महादेवासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी

Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'

Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

 

Web Title: Shri Ramayana Express to run from 28 March : IRCTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.