गोव्यात श्रीराम सेनेवरील बंदीत वाढ
By admin | Published: January 13, 2015 03:10 AM2015-01-13T03:10:41+5:302015-01-13T03:10:41+5:30
जहाल हिंदुत्ववादी प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेनेला गोव्यात प्रवेश करू द्यायचा नाही, या भूमिकेवर सरकार ठाम आहे.
पणजी : जहाल हिंदुत्ववादी प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेनेला गोव्यात प्रवेश करू द्यायचा नाही, या भूमिकेवर सरकार ठाम आहे. श्रीराम सेनेवर पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी लागू होणार आहे.
श्रीराम सेनेवरील सहा महिन्यांची बंदी संपुष्टात आल्याची मला कल्पना नव्हती. मात्र आता बंदीचा काळ पुन्हा वाढविला जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राज्य माहिती आयोगाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर दिली. येत्या पंधरवड्यात राज्य माहिती आयुक्तांची निवड केली जाईल. मुख्य माहिती आयुक्तांना निवृत्तीनंतर सेवावाढ देण्याची तरतूद नसली तरी पर्याय काढण्याचा प्रयत्न करू, असेही पार्सेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)