सॉफ्टवेअरचा धोनी! झारखंडच्या तरुणाची नेत्रदीपक भरारी; Amazon कडून 1.15 कोटी पगाराची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:32 AM2022-01-22T09:32:38+5:302022-01-22T09:33:50+5:30

Shubham Raj : शुभम राज याची कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Shubham Raj from ranchi bags 1 crore package from amazon berlin becomes software ke dhoni | सॉफ्टवेअरचा धोनी! झारखंडच्या तरुणाची नेत्रदीपक भरारी; Amazon कडून 1.15 कोटी पगाराची नोकरी

सॉफ्टवेअरचा धोनी! झारखंडच्या तरुणाची नेत्रदीपक भरारी; Amazon कडून 1.15 कोटी पगाराची नोकरी

Next

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. एका तरुणाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. झारखंडच्या रांचीमधील एका तरुणाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शुभम राज (Shubham Raj) असं या तरुणाचे नाव असून तो रांचीचा रहिवाशी आहे. शुभमला अ‍ॅमझॉन बर्लिनमध्ये (Amazon Berlin) नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. यासाठी त्याला कंपनीकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. शुभम राज याची कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम राज हा कोडिंग आणि अल्गोरिदममध्ये माहीर आहे. 

शुभमच्या या दमदार कामगिरीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. त्याची नेत्रदिपक कामगिरी पाहून आई-वडील आणि शेजाऱ्यांनाही खूप आनंद झाला आहे. त्याच्या शेजारचे मंडळी त्याला 'सॉफ्टवेअरचा धोनी' म्हणतात. शुभमबद्दल अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. यापूर्वी देखील शुभम राज याला अनेक कंपन्यांकडून जॉबची ऑफर आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या तरुणावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केला आहे. रांची स्थित मदन सिंह आणि रीना सिंह यांच्या घरी उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचा मुलाग शुभम राज याला अ‍ॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

अ‍ॅमेझॉनच्या बर्लिन ऑफिसमध्ये काम करणार 

शुभम राज हा अ‍ॅमेझॉनच्या बर्लिन ऑफिसमध्ये काम करणार आहे. तो कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनिअर म्हणून नियुक्त झाला आहे. ही माहिती कळताच मदन सिंह यांच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. 2021 मध्ये शुभम राज यांची निवड जागतिक स्तरावरील स्पर्धा असलेल्या गुगल समर ऑफ कोडसाठी (GSOC-2021) देखील झाली होती. या नंतर आपल्या करीअरचा मार्ग अधिक सोपा झाल्याची माहिती शुभम राज याने दिली.

अकरावीत असल्यापासूनच कोडिंगचा अभ्यास सुरू 

शुभम यांने रांचीमध्येच 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या शुभम राज याला त्यानंतर आयआयटीला प्रवेश मिळाला. शुभम सध्या आयआयटी आगरतळामध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अ‍ॅमेझॉनसाठी बर्लिनमध्ये काम करणार आहे. त्याने अकरावीत असल्यापासूनच कोडिंगचा अभ्यास सुरू केला होता. सुरुवातीपासूनच कोडिंगची आवड होती. या क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Shubham Raj from ranchi bags 1 crore package from amazon berlin becomes software ke dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.