‘शुभमंगल’ ४ लाख काेटींवर; यावर्षी सनईचाैघड्यांची उलाढाल वाढणार, प्रतिविवाह काेट्यवधींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:10 AM2023-10-20T07:10:53+5:302023-10-20T07:11:23+5:30
लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सणासुदीनंतर देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू हाेणार आहे. देशभरात यंदाच्या हंगामात तब्बल ३५ लाख लग्न हाेण्याचा अंदाज असून आतपासूनच सर्वांची लगीनघाई सुरू झाली आहे.
लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे. सणासुदीची खरेदी, लग्नावर हाेणारे खर्च इत्यादींमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकासदर वाढून ६.५ ते ६.८ टक्के राहू शकताे, असा अंदाज आहे.
यावर्षी २३ नाेव्हेंबरनंतर लग्नाचा हंगाम सुरू हाेणार आहे. साधारणत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणाऱ्या हंगामात ३५ लाखांपेक्षा जास्त विवाह समारंभ हाेणार आहेत. यासाठी देशभरात विविध क्षेत्रातील व्यापारीही सज्ज झाले आहेत.
२० प्रमुख शहरांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास २ लाख विवाह दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्राे शहरांमध्येच हाेण्याचा अंदाज आहे. सुमारे २ लाख काेटी रुपयांची उलाढाल या शहरांतून हाेईल.
लग्नासाठी अशी हाेते खरेदी
घरांची दुरूस्ती, रंगरंगाेटी, दागिन्यांची खरेदी, लग्नासाठी आवश्यक वस्त्रे, जाेडे, आमंत्रण पत्रिका, सुका मेवा, मिठाई, फळे, पूजा साहित्य, किरणा, सजावटीचे सामान, भेटवस्तू, किरणा, वाहने इत्यादींवर प्रचंड खर्च हाेताे.
या सेवांवर हाेताे खर्च
लग्नासाठी काही सेवा महत्त्वाच्या असतात. त्यात सभागृह, लाॅन, मंडप, खानपान सेवा, स्वागत, सनई, बॅंडबाजा, फाेटाेग्राफर, व्हिडीओग्राफर, घाेडे, बग्गी, राेषणाई इत्यादींवर प्रमुख भर असताे.
एका विवाहात एवढा खर्च!
६ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह ३ लाख रुपये
१० लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह ६ लाख रुपये
१२ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह १० लाख रुपये
६ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह २५ लाख रुपये
५० हजार लग्नांत
५० लाखांचा खर्च
५० हजार लग्नांत प्रतिविवाह १ काेटी रुपयांचा खर्च.
सणासुदीत
खिशावर भार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामासोबतच सुट्या सुरू झाल्यामुळे लोक प्रवास व पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे हवाई प्रवास भाडे आणि हॉटेलांचे भाडे यांत जबरदस्त वाढ झाली आहे.
दिवाळीसाठी १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देशातील प्रमुख स्थानांसाठी हवाई भाडे ४४ टक्के वाढले आहे. देशातील हवाई प्रवास क्षमता कमी झाली आहे. वाढलेली मागणी आणि प्रवासी वाहतूक क्षमतेतील कमतरता यामुळे ही भाडेवाढ झाली आहे.
८,७८८ : सरासरी भाडे मुंबई - दिल्ली मार्गावरील दिवाळीच्या आठवड्यातील आहे.