कृउबात उतराई,खेचाई थांबली शुकशुकाट : हमालीची ३५ टक्के दरवाढीची मागणी
By admin | Published: January 21, 2016 12:04 AM2016-01-21T00:04:12+5:302016-01-21T00:04:12+5:30
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापाडी बांधवांनी बेमुदत काम बंद केल्यामुळे मार्केट भागातील उतराई, खेचाईचे कामे बुधवारी बंद होती. हमाल बांधव ३५ टक्के दरवाढीवर ठाम असल्याने कृउबामध्ये शुकशुकाट होता.
Next
ज गाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापाडी बांधवांनी बेमुदत काम बंद केल्यामुळे मार्केट भागातील उतराई, खेचाईचे कामे बुधवारी बंद होती. हमाल बांधव ३५ टक्के दरवाढीवर ठाम असल्याने कृउबामध्ये शुकशुकाट होता.तीन महिन्यांपूर्वी संपला करारकृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात व्यापारी असोसिएशनमार्फत खरेदीदाराकडून भाववाढीचा करार करण्यात येतो. त्याची मुदत नोव्हेंबर २०१५ मध्ये संपली आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेकडून दोन वेळा व्यापारी असोसिएशनसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर संघटनेची व व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. मात्र त्यात भाववाढीबाबत निर्णय झाला नाही.व्यापारी असोसिएशन २० टक्के भाववाढीसाठी तयारदोन वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार हमाल व मापाडी बांधवांना ३५ टक्के भाववाढ देण्यात आली होती. त्यानुसार यावर्षीदेखील ३५ टक्के वाढ द्यावी अशी जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेची मागणी आहे. मात्र व्यापारी असोसिएशनकडून केवळ २० टक्के दरवाढ देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. व्यापारी व हमालमापाडी यांच्यातील चर्चा फिस्कटल्यामुळे हमाल बांधवांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.४० आडत दुकानांवर शुकशुकाटहमाल व मापाडी संघटनेच्या सदस्यांनी बेमुदत बंद पुकारल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती भागात असलेल्या ४० आडत दुकानांवरील खेचाई, उतराई, भराई यासारखी कामे बंद होती. सर्व हमाल बांधव कृउबाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोकळ्या जागी बसलेेले होते. प्रारंभी दुपारी १२ वाजता हमाल बांधवांनी या ठिकाणी आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, शरद चौधरी, तुकाराम गर्जे, गफूर मामू, सुकदेव शेळके, आदिनाथ जयकर, अंबादास भटोळे, विष्णु पवणे, डिगंबर साबदे उपस्थित होते.