शनिपेठ दंगलीतील आरोपींची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 10:41 PM2016-02-24T22:41:26+5:302016-02-24T22:41:26+5:30
जळगाव : शनिपेठ दंगलीतील सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींनी जामीन मिळावा, म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर न्यायालयाने तपासाधिकार्यांचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. तपासाधिकारी गुरुवारी खुलासा सादर करणार आहेत.
Next
ज गाव : शनिपेठ दंगलीतील सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींनी जामीन मिळावा, म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर न्यायालयाने तपासाधिकार्यांचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. तपासाधिकारी गुरुवारी खुलासा सादर करणार आहेत.शनिपेठ दंगलप्रकरणी पोलिसांनी २३ फेबु्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपी शेख दानीश शेख सत्तार (२२), शेख जफ्फार शेख शरीफ (२७), शेख अय्याज शेख शहानुद्दीन (२८), शहजाद खान सलीम खान (२०) व रेहान शेख इक्बाल (१८) सर्व रा.शनिपेठ, जळगाव यांना अटक केली होती. या पाचही आरोपींना बुधवारी दुपारच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी न्यायाधीश ए.डी. बोस यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारपक्षाकडून युक्तिवाद करतांना ॲड.फुलपगारे यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, आरोपींचे वकील ॲड.राशीद पिंजारी यांनी युक्तिवादात आरोपींना न्यायालयीन कोठडी मागितली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.आधीच्या १२ जणांनाही न्यायालयीन कोठडीशनिपेठ पोलिसांनी या गुन्ात सुरुवातीला अटक केलेल्या लखन सारवान, अमित धवलपुरे, आकाश मिलांदे, योगेश जोहरे, किशोर गोहीत, विशाल सोनवाल, हेमंत गोयल, सलीम खान अनिस खान, आसिफ शहा बशीर शहा, शेख जाकीर शेख रहीम, शेख नासीर शेख रशीद, अलफैज सैफुद्दीन यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने त्यांनाही दुपारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.आरोपींचे जामिनासाठी अर्जया गुन्ातील सर्व आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर न्यायालयाने तपासाधिकार्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. तपासाधिकार्यांच्या खुलाश्यावर गुरुवारी कामकाज होणार आहे.