CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:09 AM2018-09-18T11:09:31+5:302018-09-18T11:15:42+5:30

CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आलं आहे.

si harimani suspended in rewari gangrape case | CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत

CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत

Next

रेवाडी - हरियाणातील रेवाडीमध्ये 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. मात्र आता CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आलं आहे.  पोलीस उप-अधिक्षक हिरामणी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यामध्ये वेळ वाया घालवण्यात आला, त्यामुळे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जातं आहे. 

बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी नीशूला पोलिसांनी अटक केल्याची माहिती याआधी पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तसेच प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने 30 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली. दीनदयाल आणि डॉ. संजीव यांचा यामध्ये समावेश आहे. तर मुख्य आरोपी नीशूलाही पकडण्यात यश आले होते.

पोलिसांनी दीनदयाल हा ट्यूबवेलचा मालक आहे. तिथेच ही घटना घडली. तर संजीव डॉक्टर आहे. त्याने आरोपींना मदत केली. तसेच या घटनेत सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याचे सांगितले. मुख्य आरोपी नीशूने हा संपूर्ण कट रचला होता. त्यानंतर घटनास्थळी डॉक्टरला बोलावण्यात आले होते. या कटात लष्कराचा एक जवान ही सहभागी आहे. मात्र तो सध्या फरार आहे. लवकरच त्याला पकडण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नाजनीन भसीन यांनी व्यक्त केला होता. 
 
 

Web Title: si harimani suspended in rewari gangrape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.