सियाचीन - २५ फूट बर्फाखाली जिवंत सापडला जवान

By admin | Published: February 9, 2016 03:09 AM2016-02-09T03:09:50+5:302016-02-09T13:28:33+5:30

सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन पंचवीस फुट बर्फाच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या भारतीय लष्कराच्या काही जवानांपैकी सोमवारी (काल) एक जवान जिवंत अवस्थेत सापडला.

Siachen - 25 soldiers found alive under snow | सियाचीन - २५ फूट बर्फाखाली जिवंत सापडला जवान

सियाचीन - २५ फूट बर्फाखाली जिवंत सापडला जवान

Next
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि.९ - सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन पंचवीस फुट बर्फाच्या ढिगा-याखाली दबलेल्या भारतीय लष्कराच्या काही जवानांपैकी सोमवारी (काल) एक जवान जिवंत अवस्थेत सापडला. (२१ वर्षांनी सियाचीनमध्ये सापडला जवानाचा मृतदेह)
३ फेब्रुवारी रोजी सियाचीनमधील हिमकडा कोसळून ही दुर्घटना घडली होती.  सहा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर लान्स नायक हनमंतअप्पा कोप्पड सुदैवाने जिवंत सापडला. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखेखाली गरम तंबूत ठेवण्यात आले असून त्याला सकाळी आर. आर. हॉस्पीटलमध्ये दाखल दाखल करण्यात येणार असल्याचे नॉर्थन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी सांगितले. 
आतापर्यंत चार जणांचे शव बाहेर काढण्यात आले असून, चौघांची ओळख पटली आहे. हे चारही जवान मृतावस्थेत सापडले. हनमंतअप्पा कोप्पडसारखे आणखी आश्चर्य घडेल, अशी अपेक्षा डी. एस. हुडा यांनी व्यक्त केली आहे. हनमंतअप्पा कोप्पडचे मुळ गाव कर्नाटकमधील धारवाड आहे. 
 
 
 
 
पाकिस्तानच्या सीमारेषेवर सरासरीपेक्षा ४५ अंशाखाली तापमानात १९ हजार ६०० फूट उंचीवर असलेली चौकी हिमस्सखलनामुळे उद्ध्वस्त होताच एका ऑफिसरसह १० जवान जिवंत गाडले गेले होते.

Web Title: Siachen - 25 soldiers found alive under snow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.