नगरमधील जर्मन स्मृतींनी सिबर्ट भारावले
By admin | Published: June 1, 2015 10:12 PM2015-06-01T22:12:38+5:302015-06-02T16:16:33+5:30
अहमदनगर: जर्मनीचे भारतातील कौन्सल जनरल मायकेल सिबर्ट नगर दौर्यावर आले असून, येथील ऐतिहासिक वास्तू संग्रहालयातील जर्मनीतील दूर्मिळ स्मृतींनी सिबर्ट भारावून गेले़ संग्रहालयातील छायाचित्रांच्या दालनाचे उद्घाटन करून त्यांनी भुईकोट किल्ला, चांदबीबीचा महल, फराहबागला भेट दिली़

मूळचे नगरचे व मागील चार दशकांपासून फ्रान्समध्ये स्थायिक असलेले डॉ़ शशी धर्माधिकारी यांनी पहिल्या महायुध्दाच्या शताब्दीनिमित्त गेल्या वर्षी भुईकोट किल्ल्यात भरवलेल्या प्रदर्शनातील चित्रे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, पत्रे व अन्य साहित्यांचे कायमस्वरुपी दालन ऐतिहासिक वास्तू संग्रहालयात उभारण्यात आले आहे़ या दालनाचे उद्घाटन सिबर्ट यांच्या हस्ते करण्यात आले़ डॉ़ रविंद्र साताळकर, शशी धर्माधिकारी, अभिरक्षक संतोष यादव आदी यावेळी उपस्थित होते़ उद्घाटनानंतर त्यांनी नगरच्या किल्ल्यातील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या खोलीला भेट दिली़ सायंकाळी फराहबाग, टँक म्युझियम, चांदबिबी महालास भेट दिली़ तसेच रात्री जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले़ ते मंगळवारी सकाळी प्राचार्य डॉ़ बार्नबस यांची भेट घेऊन दुपारी मंुबईकडे रवाना होणार आहेत़