बार्शीटाकळीत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम
By admin | Published: December 18, 2014 12:40 AM2014-12-18T00:40:37+5:302014-12-18T00:40:37+5:30
बार्शीटाकळी: येथील ग्रामीण रुग्णालयात १५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला.
Next
न ी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताकदिनी खास पाहुणे राहणार असून त्यांच्या भेटीला लक्ष्य ठरवून लष्कर-ए-तोयबाकडून हल्ला केला जाऊ शकतो, या गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक स्थळे, शाळा आणि मॉलसारख्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहेत.पेशावर येथील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले.गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मध्य प्रदेशच्या कारागृहातून पाच अतिरेकी पळून गेले होते. त्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचा लष्करच्या अतिरेक्यांशी संपर्क असून अलीकडेच लष्करच्या अतिरेक्यांचे फोन खंडित करण्यात आले असता या सर्वांवर हल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. ओबामा हे २६ जानेवारी रोजी भारतभेटीवर येत असून पळून गेलेल्या या अतिरेक्यांपैकी एक किंवा दोन जणांकडून त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता पाहता गृहमंत्रालयाने सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे.शाळांची सुरक्षा मजबूत करा- केंद्राचे निर्देश देशभरातील शाळांमध्ये संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश केंद्राने तातडीने राज्यांना दिले आहेत. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारांना राज्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविणे व अधिक भक्कम करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. गृह मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत दहशती हल्ल्यानंतर मुलांच्या सुटकेची योजना, ओलीस ठेवले जाण्याला प्रतिबंध घालण्याचे उपाय व संकटकाळी दरवाजे व शाळेचे मुख्य फाटक बंद करणे अशा अनेक प्रसंगांकरिता योजना आखण्यात येणार आहेत. ---------------२०१० मध्ये गृह मंत्रालयाने शाळांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे या अधिकार्यांनी सांगितले. या सूचना मुंबईतील दहशती हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक झाल्यानंतर जारी करण्यात आल्या होत्या. या सूचनांची फेरतपासणी करून विद्यमान परिस्थिती लक्षात घेता त्यात काही नव्या सूचना समाविष्ट होणार असून काही बदलही केले जाणार आहेत असे ते पुढे म्हणाले. काही शाळांना विशेष निर्देश दिले जाणार असून सुरक्षा सरावासाठी त्यांना स्थानिक पोलीस व प्रशासनासोबत समन्वय साधण्यास सांगितले जाणार आहे. दिल्ली व मुंबईतील काही मुख्य शाळा तसेच उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातील काही निवासी शाळांना विशेष सुरक्षा देण्यात येण्याची शक्यता या अधिकार्यांनी व्यक्त केली.