हेमा मालिनींचा असाही प्रचार, सोशल मीडियात फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:56 AM2019-04-01T08:56:34+5:302019-04-01T08:59:16+5:30
हेमा मालिनी या आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
उत्तरप्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. हेमा मालिनी या आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. रविवारी प्रचारादरम्यान गोवर्धन परिसरात हेमा मालिनी एका शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत दिसल्या. दरम्यान, यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
Mathura: Hema Malini, BJP MP & Lok Sabha candidate from the constituency, started her poll campaigning yesterday & was seen carrying bundles of freshly harvested crop to lend a hand to women working in a wheat field in Govardhan area pic.twitter.com/XLMQWPjgEU
— ANI UP (@ANINewsUP) March 31, 2019
हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये हेमा मालिनीने भाजपाध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या 2003 ते 2009 या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या. 2014 लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा त्यांना भाजपाने मथुरा याच मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे.