सिद्धू तुरुंगात बनले क्लर्क, तीन महिने वेतन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:24 AM2022-05-26T07:24:38+5:302022-05-26T07:25:12+5:30
सुरुवातीचे तीन महिने त्यांना कामाचे कोणतेही वेतन मिळणार नाही
चंडीगड : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे आता पटियाला तुरुंगात क्लर्क बनले आहेत. सिद्धू आपल्या बराकमधूनच काम करतील. त्यांची सुरक्षा लक्षात घेता तुरुंगातील लिपिकाचे काम त्यांना दिले आहे. त्यांना रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत काम करावे लागेल.
सुरुवातीचे तीन महिने त्यांना कामाचे कोणतेही वेतन मिळणार नाही. सिद्धू यांना रोडरेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सिद्धू यांची ड्युटी कारखान्यात अथवा बेकरीत लावली जाऊ शकत होती. पण, तेथे कुख्यात कैदी काम करतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा लक्षात घेता त्यांना लिपिकाचे काम देण्यात आले आहे. तुरुंग अधीक्षक मनजीत सिंग टिवाणा यांनी सांगितले की, सिद्धू तुरुंगात पूर्ण सहकार्य करत आहेत.