पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा - सिद्धू

By admin | Published: July 25, 2016 12:17 PM2016-07-25T12:17:29+5:302016-07-25T12:52:16+5:30

पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा दिला असल्याचं राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे

Sidhu resigns due to stay away from Punjab - Sidhu | पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा - सिद्धू

पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा - सिद्धू

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 25 - पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा दिला असल्याचं नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे.  राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली. विशेष म्हणजे संपुर्ण पत्रकार परिषदेत सिद्धंनी एकदाही भाजपाचं नाव घेतलं नाही. तसंच आम आदमी पक्षात प्रवेश करण्यासंबंधी किंवा मुख्यमंत्रीपदासाठी आपण इच्छुक असल्यासंबंधी वक्तव्य करण टाळलं. 
 
'पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा दिला आहे. मला कुरुक्षेत्र आणि त्यानंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढण्यास सांगण्यात आलं होतं. मी नकार देत माझ्या लोकांना धोका देणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. जेव्हा मोदींची लाट आली तेव्हा विरोधकांना बुडवलं, सिद्दूला पण बुडवून टाकलं. हे पहिल्यांदा असंत तर मी सहन केलं असतं, पण ही चौथी वेळ आहे', असा खुलासा यावेळी सिद्धू यांनी केला आहे. 
 
'लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकत नाही. जगातील कोणताच पक्ष पंजाबहून मोठा नाही. जिथे पंजाबचं हित असेल तिथे मी उभा राहणार', असंही सिद्धू बोलले आहेत.
 
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील एक्झिटमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपामधून बाहेर पडल्यानंतर सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असून त्यांना आपतर्फे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान सिद्धू यांच्या पत्नीनेही आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. 
 
दरम्यान यापूर्वी सिद्धू यांनी पक्षावरील नाराजी व्यक्त केली होती. पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने मला द्यावी, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. पक्षाला व देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते; परंतु पक्ष तशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देत नसल्यामुळे मी बाजूला फेकलो गेलो आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली होती. 
 
भाजपावर नाराज असलेले सिद्धू आपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र सिद्धूसांरखा वक्ता बाहेर पडू नये यासाठी भाजपावालेही कसून प्रयत्न करत होते. मात्र अखेर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सिद्धूनी त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे सोपवला. दरम्यान सिद्धू यांचे आमच्या पक्षात सदैवच स्वागतच असेल, मात्र त्यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही, असे सांगत 'आप'नेही त्यांच्या पक्षप्रवेशासाठीचे सर्व दरवाजे उघडे असल्याचे सूचित केले. 
 

Web Title: Sidhu resigns due to stay away from Punjab - Sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.