सिद्धू अमृतसर पूर्वमधून लढणार

By admin | Published: January 19, 2017 05:03 AM2017-01-19T05:03:21+5:302017-01-19T05:03:21+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी लांबी मतदारसंघातून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Sidhu will fight in the east from Amritsar | सिद्धू अमृतसर पूर्वमधून लढणार

सिद्धू अमृतसर पूर्वमधून लढणार

Next


चंदीगड : पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधासनभा निवडणुकीसाठी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी लांबी मतदारसंघातून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या दोघांशिवाय आपचे नेते भगवंत मान यांनी जलालाबाद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
लांबी मतदारसंघात काँग्रेसचे नेते कॅ. अमरिंदरसिंग, शिरोमणी अकाली दलाकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल तसेच दिल्लीचे माजी आमदार आणि आप नेते जनरेलसिंग, अशी त्रिकोणी लढत होणार आहे. अमरिंदरसिंग यांनी मंगळवारी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ पटियाला येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Web Title: Sidhu will fight in the east from Amritsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.