देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 07:18 AM2020-12-22T07:18:02+5:302020-12-22T07:18:24+5:30

CoronaVirus News : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

Signs of Corona outbreak in the country - dr Harshavardhana | देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

Next

नवी दिल्ली : देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरला असल्याची चिन्हे आहेत. मात्र, तरीही अतिशय सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पुढील महिन्यापासून भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात दररोज वीस हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतामध्ये ९५.५३ टक्के आहे. त्या तुलनेत रशिया, अमेरिका, ब्राझीलसारख्या विकसित देशांमध्ये मात्र कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतापेक्षा कमी म्हणजे ६० ते ७० टक्के आहे. कोरोना साथीला नियंत्रणात आणायचे असून, मास्क वापरणे, हात सतत धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हेच सध्यातरी प्रभावी उपाय आहेत. 
ते म्हणाले की, कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला येत्या जानेवारी महिन्यातील कोणत्याही आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. जनतेला देण्यात येणारी कोरोना लस परिणामकारक व सुरक्षित असावी, यावर केंद्र सरकारचा कटाक्ष आहे.

रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट 
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. असे असले तरी कोरोना साथीला नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने बनविलेले नियम जनतेने यापुढेही पाळायला हवेत. 

Web Title: Signs of Corona outbreak in the country - dr Harshavardhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.