'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:25 PM2021-09-21T20:25:33+5:302021-09-21T20:28:49+5:30
Jammu-Kashmir: 'केंद्र सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे.'
नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हिंदू-मुस्लीमात फुट पाडत असल्याचा आरोप केला आहे. 'नेहरू, वाजपेयी सारख्या नेत्यांची जम्मू-काश्मीरसाठी दूरदृष्टी होती. पण, हे आताचं सरकार फक्त हिंदू-मुस्लीमात फुट पाडण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
https://t.co/mDvly1pFMq
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2021
ब्रिटनमध्ये नवीन नियमांनुसार, ज्या भारतीय प्रवाशांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे उत्पादित कोविशील्ड लस घेतली आहे, त्यांचे लसीकरण ग्राह्य धरले जाणार नाही.#coronavirus
त्या पुढे म्हणाल्या की, या भाजप सरकारसाठी आता सरदार खलिस्तानी झाले, आम्ही पाकिस्तानी झालोत आणि फक्त भाजप हिंदुस्थानी आहे. हे सरकार फक्त नावं बदलन्याचं काम करत आहे. पण, नावं बदलल्याने काही होणार नाही. शहरांची नावे बदलली, अनेक शाळांना हुतात्म्यांची नावे दिली जात आहे. पण, शाळांची नावं बदलल्याने मुलांना रोजगार मिळणार नाही. केंद्र सरकार तालिबान आणि अफगाणिस्तानबद्दल बोलतात पण आपल्या देशातील शेतकरी आणि बेरोजगारीबद्दल कधीच बोलत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.
औषधं आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेलेली असता अज्ञातांनी रॉडने केला हल्ला, अॅसिड फेकणार होते अभिनेत्रीचा दावा, मुंबईतील घटना @iampayalghoshhttps://t.co/spnSOMjgAY
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2021
पीडीपी निवडणूक लढवणार
मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी घोषणा आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पीडीपी आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण, 2018 मध्ये सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर भाजपने आपला पाठिंबा काढून घेतला.