‘नुसते मास्क चालणार नाही’, पंतप्रधानाना ६०० वैज्ञानिकांचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:20 AM2021-05-02T01:20:45+5:302021-05-02T01:21:03+5:30
व्यापक उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधानाना ६०० वैज्ञानिकांचे साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केवळ सामाजिक अंतराचे पथ्य पाळून कोविड-१९च्या संसर्गास आळा बसणार नसून तपासण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ करत पॉजिटिव्ह रुग्णांबरोबरच लक्षणविरहित बाधितांचेही विलगीकरण करण्याची सिंगापूर, दक्षिण कोरिया व जपानची कार्यपद्धती आचरणात आणली जावी, अशी मागणी पंतप्रधानाना पत्र लिहून देशभरातील ६०० वैज्ञानिकांनी केली आहे.
भविष्यात लक्षावधी रुग्णांवर एकाच वेळी उपचार करण्याची पाळी येऊ शकते, याचे भान ठेवून आरोग्य सुविधांचा प्रचंड विस्तार करण्याची गरज या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. लक्षणे न दिसणा-या, मात्र त्यांचा संसर्ग पसरवणा-या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच योग्य ते उपचार करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
या वैज्ञानिकांनी पंतप्रधानांकडे केलेल्या अन्य शिफारशी याप्रमाणे:
nदेशांतील बहुतेक संशोधन संस्था व विद्यापीठांतील प्राणीशास्त्र विभागांत आरटी- पीसीआर यंत्रे आहेत; त्यांचा वापर कोविड तपासणीसाठी केला जावा. या संस्थेतील अध्यापक व विद्यार्थी आपली सेवा देण्यास तयार आहेत; त्यांचा वापर व्हावा..
nएखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्याच्या निवासाचा समग्र परिसर, शेजारीपाजारी, नजिकची बाजारपेठ, तसेच त्या व्यक्तीने भेट दिलेल्या भागांतील जनतेची तपासणी केली जावी. यासाठी चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढवावे, चाचणी कीट्स व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे व विज्ञान शाखेच्या बेकार पदवीधरांना सेवेत घेऊन प्रशिक्षण देण्यात यावे.
nकोरोना विषाणूच्या जनुकीय सिक्वेन्सिंगमध्ये भारत बराच पिछाडीवर आहे. विषाणूची किती उत्प्रेरिके देशात सक्रिय आहेत, याविषयीची माहितीही उपलब्ध नाही. यामुळे कोविड व्यवस्थापनात अडचणी येत आहेत. त्या दूर करताना भारतीय रुग्णांचे जिनोमिक सिक्वेन्सिंगचे प्रमाण वाढवून ती माहिती जाहीर करव्यात.
nथेट प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विलगीकरण विभाग कुरू करण्यात यावेत. खासगी रुग्णालयांतील संसाधनांच्या मदतीने खास विभाग तयार करून तेथे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. देशातील इनडोअर स्टेडियम व तत्सम सुविधांना कोविड रुग्णालयांत रूपांतरित करावे व तेथे काम करण्यासाठी खासगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिकांचे साहाय्य घ्यावे.
nआरोग्यकर्मींसाठी मोठ्या प्रमाणात पीपीई गिअर, तसेच आम लोकांसाठी मास्क व सॅनिटायझरचे उत्पादन वाढवताना लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांना त्या कामासाठी वापरावे.
nअत्यल्प वेळेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स उत्पादित करण्याचे आव्हान देशासमोर आहे. तुलनेने स्वस्त असलेल्या व्हेंटिलेटर्सचे डिझाईन देशातील संशोधकानी तयार केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही आपले डिझाईन उघड केले आहेत. भारतीय उत्पादकांना हे व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यासाठी उत्तेजन दिले जावे.
nआकस्मिक लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांनी दाटीवाटीने राहू नये यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने त्यांच्या प्रस्थानाची व्यवस्था करण्यात यावी