खोट्या कागदपत्रावर सिमीच्या आरोपीने मिळवला वाहन परवाना आरटीओ कॅम्पमधील प्रकार : मुंबई गुन्हे शाखेकडून प्रकरणाची चौकशी
By admin | Published: October 21, 2016 12:18 AM2016-10-21T00:18:16+5:302016-10-21T00:18:16+5:30
जळगाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने जळगाव आरटीओंकडून माहिती मागविली आहे.या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू आहे.
Next
ज गाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने जळगाव आरटीओंकडून माहिती मागविली आहे.या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू आहे.जिल्ातील प्रत्येक नागरिकाला जळगावात येऊन वाहन परवाना काढणे शक्य नसल्याने आरटीओ कार्यालयामार्फत प्रत्येक तालुकास्तरावर आठवड्यातून एकदा कॅम्पचे आयोजन केले जाते. मे महिन्यात भडगाव येथे झालेल्या अशाच एका कॅम्पमध्ये सिमीच्या आरोपीने बनावट कागदपत्र सादर करून वाहन परवाना मिळवला आहे.दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा व एटीएसकडून त्याची गोपनीय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाच्या तपासाधिकार्यांनी यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून काही माहिती मागवली आहे.निरीक्षक व लिपीकाला नोटीसकागदपत्रांची खातरजमा न करता वाहन परवाना दिल्याप्रकरणी संबंधित मोटार वाहन निरीक्षक व परवाना वितरण विभागाचे लिपीक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसच्या बाबतीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील व लिपिकाला विचारणा केली असता दोघांनी या वृत्ताचा इन्कार केला.एटीएसकडून चौकशी सुरूमुंबई एटीएसकडून राज्यातील सर्वच सिमीच्या आरोपींची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडे वाहन परवाना आहे का? असेल तर कोणाच्या नावावर आहे. त्यांनी आरटीओकडे कोणते कागदपत्र सादर केले आहेत, त्याने दिलेल्या पत्त्यावरच तो राहतो का? सद्यस्थितीच्या हालचालींवर लक्ष ठवले जात आहे. आरटीओ कार्यालयातीलही त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे.जिल्ात सिमीचे ४९ आरोपीजळगाव जिल्ात सिमीचे ४९ आरोपी आहेत. त्यातील ११ जळगाव शहरात राहतात. एका आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे तर एक जण रेकॉर्डला फरार आहे. उर्वरित जिल्ाच्या इतर तालुकास्तरावर राहतात. एटीसीकडून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ात बांग्लादेशींचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या लोकांनाही वाहन परवाना देण्यात आला आहे का? याचीही चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.-कोट..कायद्याच्या तरतुदीनुसार प्रत्येकाला वाहन परवाना काढण्याचा अधिकार आहे, मात्र एखाद्याने खोटे व बनावट कागदपत्र सादर केले असतील तर तो गुन्हाच आहे. या प्रकरणी मी कोणालाही नोटीस दिलेली नाही.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी