एकाचवेळी बर्फवृष्टी, धुके व पूर; तीन राज्यांत वेगवेगळे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:16 AM2023-12-18T06:16:33+5:302023-12-18T06:16:42+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी; झारखंडमध्ये धुके अन् तामिळनाडूत पुराने कहर

simultaneous snowfall, fog and floods; Different environment in three states | एकाचवेळी बर्फवृष्टी, धुके व पूर; तीन राज्यांत वेगवेगळे वातावरण

एकाचवेळी बर्फवृष्टी, धुके व पूर; तीन राज्यांत वेगवेगळे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. काश्मीरच्या मैदानी भागात शनिवारी हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली असून, उत्तर भारतात थंडीने हुडहुडी भरली आहे. झारखंडमध्ये धुक्याची चादर पसरली असताना दुसरीकडे तामिळनाडूत मात्र पुराने कहर केला असून, अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. 

काश्मीर : काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू आणि काश्मीर व लडाखमधील शिखरांवर जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. शनिवारी श्रीनगरमध्ये तीन इंच बर्फ पडला.  यामुळे अनेक महामार्ग बंद होते.

सिक्कीमसाठी ठरले वाईट वर्ष
वर्ष सरत आले तरी तिस्ता नदीला आलेल्या पुराच्या कटू आठवणी सिक्कीमच्या नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील. ४ ऑक्टोबर रोजी उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आल्याने किमान ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, ७७ जण बेपत्ता झाले होते आणि हजारो लोक बेघर झाले होते. या घटनेत किमान १,१७३ घरांचे नुकसान झाले. तर मंगन जिल्ह्यातील चुंगथांग जलविद्युत प्रकल्प असलेले धरण पूर्णपणे 
उद्ध्वस्त झाले.

तमिळनाडूत पूरग्रस्तांना दिलासा
मिचाँग चक्रीवादळामुळे पाऊस आणि पुरामुळे तामिळनाडूत मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी रविवारी नुकसान झालेल्या कुटुंबीयांना ६००० रुपयांची रोख मदत देणे सुरू केले आहे. रोख मदत देण्यासाठी राज्य सरकारने १,४८६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

माऊंटअबू येथे पारा उणे १ अंशावर
nशनिवारी मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातील अनेक भागांत हलका पाऊस सुरू होता. त्यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. 
nउत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी धुके पसरण्यासह पारा घसरला आहे. सकाळी राजधानी दिल्लीतील अनेक भागांत पाऊस झाला. 
nसंपूर्ण शहरात धुकेही पसरले आहे. राजस्थानातील माऊंटअबू येथे पारा उणे १ अंशावर गेला आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 
पंजाब, हरयाणातील हवामान बदलले आहे. महाराष्ट्रात दुपारी कडक उन तर रात्री थंडी पडत आहे.

Web Title: simultaneous snowfall, fog and floods; Different environment in three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस