गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व

By admin | Published: January 1, 2016 01:57 AM2016-01-01T01:57:35+5:302016-01-01T01:57:35+5:30

पाकिस्तानी गायक अदनान सामीला नववर्षात १ जानेवारीपासून भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे गुरुवारी याबाबत घोषणा करण्यात आली.

Singer Adnan Sami's Indian Citizenship | गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व

गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व

Next

नवी दिल्ली: पाकिस्तानी गायक अदनान सामीला नववर्षात १ जानेवारीपासून भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे गुरुवारी याबाबत घोषणा करण्यात आली.
मानवीय दृष्टिकोनातून आपल्याला भारतीय नागरिकत्व देण्यात यावे असा अर्ज सामीने केला होता. तूर्तास तो तीन महिन्यांच्या व्हिसावर येथे वास्तव्याला आहे. गृहमंत्रालयाने ६ आॅक्टोबरला त्याला हा व्हिसा दिला होता. पाकिस्तानच्या लाहोर येथे जन्मलेला ४६ वर्षीय सामी सर्वप्रथम ३१ मार्च २००१ रोजी पर्यटक व्हिसावर भारतात आला होता. इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्ताने त्याला एक वर्षासाठी हा व्हिसा जारी केला होता. त्यानंतर वेळोवेळी त्याने व्हिसाचे नूतनीकरण केले. दरम्यान २७ मे २०१० रोजी काढलेल्या त्यांच्या पासपोर्टची मुदत मे २०१५ मध्ये संपली. परंतु पाकिस्तानी सरकारने त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यानंतर त्याने आपल्याला पाकिस्तानात पाठविले जाऊ नये यासाठी गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. त्यापाठोपाठ भारताचे नागरिकत्व देण्यासाठी अर्ज केला.

Web Title: Singer Adnan Sami's Indian Citizenship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.