लाखोंच्या हृदयाचा ठाव घेणारे गायक भूपेन हजारिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:02 AM2019-01-26T04:02:45+5:302019-01-26T04:03:00+5:30
उत्तर-पूर्व भारतीय आसाममधील एक बहुमुखी गायक , संगीतकार अशी भूपेन हजारिका यांची ओळख. आसामी भाषेत त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती, गीतलेखन, तसेच संगीतही दिले आहे.
नवी दिल्ली- उत्तर-पूर्व भारतीय आसाममधील एक बहुमुखी गायक , संगीतकार अशी भूपेन हजारिका यांची ओळख. आसामी भाषेत त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती, गीतलेखन, तसेच संगीतही दिले आहे. त्यांना आसामी संस्कृती आणि संगीत यांची उत्तम जाण होती. ते भारतातील एकमेव असे कलाकार होते की जे स्वत:च गाणे लिहायाचे, संगीतबध्द करायचे आणि गायचेही. त्यांनी कविता लेखन, पत्रकारिता, गायन, चित्रपट निर्मिती सारख्या अनेक क्षेत्रात काम केले.
भूपेन हजारिका यांचा जन्म आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील सदिया येथे झाला. हजारिकाचे वडील नीलकांत आणि आईचे नाव होते शांतीप्रिया. त्यांचे वडील आसामच्या शिवसगर जिल्ह्यातील नागरा शहरात रहायचे. भूपेन हजारिका दहा भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांना संगीताची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली.
हजारिकांनी आपले पहिले गाणे आपल्या बालपणातच लिहिले होते. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी पार्श्वगायनात पदार्पण केले. १९३९ साली वयाच्या बाराव्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’मध्ये त्यांनी छोटीशी भूमिका केली व पार्श्वगायनही केले.
हजारिका यांनी तेजपूरमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील शिक्षण त्यांनी गुवाहाटीमध्ये घेतले. १९४२ मध्ये गुवाहाटीच्या त्यांनी कॉटन कॉलेजमधून इंटरमिजिएट पूर्ण केले. १९४६ मध्ये हजारिका यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पॉलिटीकल सायन्समध्ये एम.ए. पूर्ण केले. यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडीची पदवी मिळवली.
भुपेन हजारिकांच्या गाण्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला आहे. हजरिकाच्या आवाजात ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा हो द्रूप की है ह्य हे गीत कोणी ऐकलं असेल तर आजही त्यांच्या स्मृतीत ते कायम असेल.