सिंगल मुख्य पान
By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:51+5:302015-08-03T22:26:51+5:30
पाणीपुरवठ्यासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी
Next
प णीपुरवठ्यासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणीसोलापूर: राज्यातील ग्रामीण भागातील गावांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना २४ तास वीज पुरवण्याची मागणी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी शासनाकडे केली आहे. पाणीपुरवठ्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना मंजूर केल्या आहेत. मात्र भारनियमनामुळे त्यांच्यावर परिणाम होत आहे. नागरिकांना पाणी असूनही विजेअभावी पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते. याची काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. सिद्धेश्वर मॉन्टेसरीचे चित्रकलेत यशसोलापूर: कोरसाला वंडर आर्ट वर्ल्ड हैदराबाद अमलापूरमतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री-पायमरी व मॉन्टेसरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यात नक्षत्रा गंजी, लक्ष्मीप्रिया दासरी, मेतील बजरंग, रम्या जाने, वैष्णवी हिपळे, सिद्वांत सक्करशेटी, आशिष आवटे, सात्विक गोद्रा, क्षितिजा शिंदे, अर्चिता धप्पाधुळे यांनी सुवर्णपदक मिळवले. संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी, मल्लिकार्जुन वाकळे, वि. ब. बर्हाणपुरे, ॲड. सि. रे. पाटील, मुख्याध्यापिका उमा बागलकोटी यांनी अभिनंदन केे ले. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनसोलापूर: जुना पुणे नाका, वसंत विहार येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. पहाटे काकडा, गाथा भजन सकाळी ९ ते ११, प्रवचन ४ ते ५, हरिपाठ सायंकळी ५ ते ६, हरिकीर्तन रात्री ७ ते ९, हरिजागर रात्री १० ते १२ असे नियमित कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सप्ताहात बाळकृष्ण कदम, राम अभंग महाराज, भीमराव आवटे महाराज, सुधाकर इंगळे महाराज, नामदेव देवकते महाराज, हरिदास महाराज शिंदे, राजू महाराज सपकाळ यांची प्रवचने होणार आहेत. बापूसाहेब महाराज देहूकर, भागवत महाराज नणदीकर, अर्जुन महाराज जाधव, निळोबा महाराज शिरसट, नारायणबाबा महाराज, भारत महाराज गरड, मारुती महाराज बोंडलेकर यांची कीर्तने होणार आहेत. १३ ऑगस्ट रोजी तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्या काल्याच्या नामसंकीर्तनाने नामसप्ताहाची सांगता होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हरिदास महाराज शिंदे यांनी केले आहे. किमान वेतन अंमलबजावणीची मागणी सोलापूर: कारखान्यात काम करणार्या कामगारांना किमान वेतन कायद्यान्वये लागू करावे, अशी मागणी एआयएमआयएमच्या वतीने सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आले. ठाकूर सावदेकर या कारखान्यात ४० कामगार कार्यरत आहेत. यावेळी युनियनचे शहर सचिव सुहेल शेख, नाारायण जाधव, महिबूब मुल्ला, शिवानंद दुलंगे, सतीश कैरमकोंडा, शंकरप्पा शिंपी, राजू बंडगर, शाणूबाई वाघमारे, शोभा शिवगुंडे, पद्मा मोळक आदी उपस्थित होते.