सिंगल न्यूज

By admin | Published: September 8, 2015 02:08 AM2015-09-08T02:08:36+5:302015-09-08T02:08:36+5:30

विशेष गौरव पुरस्कारासाठी आवाहन

Single News | सिंगल न्यूज

सिंगल न्यूज

Next
शेष गौरव पुरस्कारासाठी आवाहन
सोलापूर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिक, विधवा व त्यांच्या इयत्ता 10 वी, 12 वीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने एअर मार्शल व्ही. एस. पाटकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारप्राप्त खेळाडू, संगीत क्षेत्राशी संबंधित विभागात पुरस्कारप्राप्त तसेच नैसर्गिक आपत्तीत बहुमोल कार्य करणार्‍यांचा गौरव करण्यात येणार आहे
संबंधितांनी वैयक्तिक अर्जासमवेत विहित नमुना फॉर्म, पाल्याचा शाळेचा बोनाफाईड दाखला, मार्कशिट, साक्षांकित प्रत, माजी सैनिक, विधवा ओळखपत्र छायांकित पत्र, डिस्चार्ज बुकमधील फॅमिली डिटेलची छायांकित प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असल्यास प्रमाणपत्र आदींसह संबंधितांनी जिल्हा सैनिक कार्यालयाशी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे.
वन्यप्रेमींना आवाहन
सोलापूर : वनसंरक्षण, संवर्धन, पर्यावरण तसेच वन्यजीव क्षेत्रात काम करणार्‍या राज्यातील सर्व स्वयंसेवी संस्थांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्?ातील उपलब्ध असलेल्या स्वयंसेवी संस्था प्रमुखांनी सोलापूर वनविभागाच्या कार्यालयातील सहपत्रामध्ये सदरील माहिती 10 सप्टेंबरपर्यंत भरून उपवनसंरक्षक, वनभवन विजापूर रोड, वनविभाग कार्यालय, सोलापूर या पत्त्यावर पाठवावी अथवा समक्ष द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक एस. बी. बडवे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
स्वच्छता अभियानाचे मूळ नाव कायम
सोलापूर : राज्यात राबविण्यात येत असलेले संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या नावात कोणत्याही स्वरूपाचा बदल झालेला नसून राज्यातील ग्रामीण भागात हे अभियान संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तर नागरी भागात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान या नावाने कार्यरत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेस मुदतवाढ
सोलापूर : खरीप हंगाम 2015 या कालावधीत राष्ट्रीय कृषी विमा योजना राज्यातील सर्व जिल्?ात राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे, यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांच्या 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत पेरण्या झाल्या आहेत. अथवा सुरू आहेत तसेच ज्या शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे असे शेतकरी यामध्ये सामील होऊ शकतात. सदरील मुदतवाढ ही उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय असणार आहे. संबंधितांनी अधिक माहितीसाठी तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी आदी कार्यालयांशी तसेच भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई, विभागीय कृषी सहसंचालक, या कार्यालयाशी अथवा नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बी. जी. बिराजदार यांनी केले आहे.

Web Title: Single News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.