सिंगल बातम्या

By admin | Published: December 12, 2015 02:37 AM2015-12-12T02:37:39+5:302015-12-12T02:37:39+5:30

हेल्पिंगच्या वतीने रक्तदान शिबीर

Single News | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

Next
ल्पिंगच्या वतीने रक्तदान शिबीर
सोलापूर : हेल्पिंग अँड फाउंडेशनच्या वतीने दमाणी रक्तपेढीत रक्तदान शिबीर घेण्यात आल़े या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केल़े यावेळी संस्थेचे अध्यक्ष आशिष सोनवणे, सचिव शुभंकर ताडमरी, आशिष सोनवणे, संतोष बाळशंकर, संतोष वायदंडे, मनोज सोनवणे, सूरज वायदंडे, दमाणीचे व्यवस्थापक अशोक नावरे उपस्थित होत़े
युवा क्रांतीतर्फे करवा यांना र्शद्धांजली
सोलापूर : चेंबर ऑफ कॉर्मसचे अध्यक्ष विश्वनाथ करवा यांना युवा क्रांती मंचच्या वतीने र्शद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी सुशीलकुमार राठी, प्रशांतकुमार राठी, मनोज शहा, दीपक समदडिया, डॉ़ सुभाष कण्णी, अँड़ अशोक जाधव, अँड़ प्रियल सारडा, डॉ़ र्शीकांत पागे, डॉ़ नितीन तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होत़े
म़ रा़ शिक्षक परिषदेतर्फे रविवारी रक्तदान
सोलापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सामाजिक बांधीलकी म्हणून 13 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मोहन पाटील यांनी दिली़ सकाळी 9 ते 12 दरम्यान जुना एम्प्लॉयमेंट चौकात हेडगेवार रक्तपेढीत हे शिबीर आयोजित करण्यात आले आह़े शिक्षकांनी यावेळी उपस्थित रहाव़े
रोटरीतर्फे मंगळवारी हाडांची ठिसूळता शिबीर
सोलापूर : रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर ईलाईटच्या वतीने हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आह़े मंगळवार, 15 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान नवीपेठेत नवे राममंदिर येथे हे शिबीर होत आह़े डॉ़ मुकुंद राय हे मार्गदर्शन करणार आहेत़
रास्त भाव धान्य दुकानांचे सर्वेक्षण करावे
सोलापूर : रास्त भाव धान्य दुकानातील 3 रुपये किलो दराने दिले जाणारे धान्य मिळत नसून याचे सर्वेक्षण करण्याची मागणी ?ुमॅनिटी सोशल ऑरगयनायझेशनच्या वतीने अध्यक्ष रवी वाघमारे यांनी अन्नपुरवठा परिमंडळ अधिकारी ‘क’ आणि ‘ड’ यांच्याकडे केली आह़े यावेळी निवेदन देण्यात आल़े
हृदयविकारावर रविवारी आयएमएतर्फे चर्चासत्र
सोलापूर : जागतिक हृदयविकार दिनानिमित्त रविवार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6़30 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने डफरीन चौकातील सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आह़े यावेळी हृदयरोगतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़

Web Title: Single News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.