सिंगल जोड
By admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:09+5:302014-12-20T22:28:09+5:30
विनायक देशमुख हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन
Next
व नायक देशमुख हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलननागपूर :शांतिनगर येथील विनायक देशमुख हायस्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मानसोपचार तज्ज्ञ प्रा. स्वाती धर्माधिकारी यांच्याहस्ते झाले. यावेळी प्राचार्य एम. आर. जोशी, ए. के. देशपांडे उपस्थित होते. संमेलनानिमित्त आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण सुभाष कोटेचा यांच्याहस्ते झाले. यावेळी रवींद्र डोळस, निरंजना रामटेके, धनंजय भिडे, पुरुषोत्तम पंचभाई उपस्थित होते. अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळानागपूर : ओमनगर येथील सार्वजनिक हनुमान देवस्थान पंचकमिटीतर्फे तीन दिवसीय अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळ्यात प्रल्हाद महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन व भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिंडी सोहळ्यात उज्ज्वल उच्च प्रा. शाळेच्या बाल कलाकारांची चमू सहभागी झाली होती. राही पब्लिक स्कूलमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमनागपूर : पाकिस्तानमधील पेशावर येथे आर्मी स्कूलवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेक विद्यार्थी ठार झाले. या निर्दोष चिमुकल्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून राही पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाळेचे अध्यक्ष विजय राऊत, मुख्याध्यापिका अनुराधा हेडाऊ आदी उपस्थित होते. नायलॉन मांजावर बंदी आणानागपूर : पतंग उत्सव जवळ आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजाचा वापर होणार आहे. हा मांजा अतिशय घातक असून, मांजामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचे अपघात झाले आहे. पशुपक्षीही मांज्यामुळे जखमी झाले आहे. जनतेच्या हितासाठी नायलॉन मांजावर बंदी आणावी, अशी मागणी नरेंद्र मोदी विचार मंचतर्फे करण्यात आली आहे. स्काऊट गाईड शिबिरनागपूर : बाल मंदिर संस्थाद्वारा संचालित लेफ्टनंट कर्नल वसंत धुंडिराज परांजपे शाळेचा स्काऊट गाईड्सचे शिबिर बजाजनगर येथे पार पडले. या शिबिरात चित्रकला, वर्ग सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापिका सावतकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या संचालिका डॉ. रंजना पारधी उपस्थित होत्या. ड्रीमलॅण्ड स्कूलचे स्नेहसंमेलननागपूर : काचोरे पाटीलनगरातील ड्रीमलॅण्ड स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांच्याहस्ते झाले. यावेळी रवि मल्होत्रा, मीरा मल्होत्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मा. गो. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.