Single Use Plastic Ban: 1 जुलैपासून प्लास्टिकच्या या वस्तू वापरता येणार नाही, सरकारनं तयार केला अॅक्शन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:21 PM2022-06-18T15:21:30+5:302022-06-18T16:07:57+5:30
Single Use Plastic Ban : CPCB ने सिंगल यूज प्लास्टिकची लिस्ट देखील तयार केली आहे. जे 1 जुलैपासून पूर्णपणे बंद होईल...
सरकारने सिंगल यूज प्लास्टिकविरोधात (Single Use Plastic) अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. यामुळे आता 1 जुलैपासून कुणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना अथवा वापरताना आढळून आल्यास, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सीपीसीबीने म्हटले आहे.
1 जुलैपासून पूर्णपणे बंद होणार सिंगल यूज प्लास्टिक -
CPCB ने सिंगल यूज प्लास्टिकची लिस्ट देखील तयार केली आहे. जे 1 जुलैपासून पूर्णपणे बंद होईल. या सर्व प्रोडक्ट्सच्या Alternative साठी 200 कंपन्या प्रोडक्ट्स तयार करत आहेत. यासाठी त्यांना लायसन्स रीन्यू करण्याची आवश्यकता नाही.
1 जुलैपासून या वस्तू होणार बंद -
- प्लास्टिक स्टिक ईयर बड्स (ear buds with plastic sticks)
- फुग्यांची प्लास्टिक स्टिक
- प्लास्टिकचे फ्लॅग
- कँडी स्टिक
- आइस क्रीम स्टिक
- थर्माकॉल
- प्लास्टिक प्लेट्स
- प्लास्टिक कप
- प्लास्टिक पॅकिंगचे सामान
- प्लास्टिकचे इन्व्हिटेशन कार्ड
- सिगारेट पॅकेट्स
- प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
प्लास्टिक यूज करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई -
सीपीसीबीने जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही दुकानात सिंगल यूज प्लास्टिक वापरले गेल्यास, त्या दुकानाचे ट्रेड लायसन्स रद्द करण्यात येईल. या नंतर हे लायसन्स पुन्हा मिळविण्यासाठी दुकानदाराला दंड भरून पुन्हा अर्ज करावा लागेल.