देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक बंद? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नेमकं काय जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:25 AM2022-06-14T08:25:26+5:302022-06-14T08:25:53+5:30

प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणासाठी ते कायमच धोकादायक ठरले आहे.

Single use plastic closed in the country from July 1 Learn exactly what single use plastic is | देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक बंद? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नेमकं काय जाणून घ्या...

देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक बंद? सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नेमकं काय जाणून घ्या...

Next

प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणासाठी ते कायमच धोकादायक ठरले आहे. प्लास्टिकपासून थोडी तरी सुटका व्हावी यासाठी १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. शीतपेयांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे?
- ज्या प्लास्टिक वस्तूंचा एकदाच वापर होणार असून नंतर त्या निरुपयोगी ठरणार आहे, अशांना सिंगल यूज प्लास्टिक असे संबोधले जाते.
- एकाच वापरानंतर प्लास्टिक निरुपयोगी ठरत असले तरी त्याचे सहजासहजी विघटन होत नाही.
- या प्रकारच्या प्लास्टिकचे रिसायकलिंगही करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढविण्यासाठी हे प्लास्टिक हातभार लावते.

यांच्यावर येणार बंदी
१०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक फलक, इअर बड स्टिक, बलून स्टिक, मिठाईच्या बॉक्सवर असणारे क्लिंग रॅप्स, आइस्क्रीम स्टिक, छोटे कप, स्ट्रॉ, प्लेट्स, पेले, चमचे, १२० मायक्रॉनहून कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवरही ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली जाणार आहे.

सिंगल यूज प्लास्टिकचा कचरा (लाख टन)
२०१८-१९ >> ३०.५९
२०१९-२० >> ३४.००

सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांची धावपळ
- सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी सॉफ्ट ड्रिंक्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सरकारला गळ घातली आहे.
- या कंपन्यांचा भारतात ५१ हजार कोटींहून अधिक रुपये मूल्याचा व्यवसाय आहे.

कोणापासून किती प्लास्टिक कचरा?
२४% इतर
१९% चिप्स आणि इतर पाकिटे 
१०% बाटल्यांची झाकणे
८% पेट बॉटल्स 
८% कचऱ्याची पिशवी
८% पॅकेजिंग साहित्य
७% रिटेल बॅग्ज
७% स्ट्रॉ
५% फूड बॅग्ज
४% क्लिंग रॅप्स

Web Title: Single use plastic closed in the country from July 1 Learn exactly what single use plastic is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.