सिंगल यूज प्लास्टिकवर देशभरात बंदी लागू; उल्लंघन केल्यास तुरुंगवास, दंडही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:32 AM2022-07-02T09:32:47+5:302022-07-02T09:33:40+5:30
उत्पादकांनी पर्यायाचा अभाव असल्याने बंदीसाठी तयार नाही, असे म्हटले होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले होते की, या उद्योगांना व जनतेला एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीच्या तयारी पुरेसा वेळ दिला.
नवी दिल्ली : एकदाच वापर (सिंगल यूज) होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुुरू झाली. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कंपन्या बंद करण्यासाठी अंमलबजावणी मोहीम सुरु केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्पादकांनी पर्यायाचा अभाव असल्याने बंदीसाठी तयार नाही, असे म्हटले होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले होते की, या उद्योगांना व जनतेला एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीच्या तयारी पुरेसा वेळ दिला. १ जुलैपासून मलबजावणीत प्रत्येकाचे सहकार्य मिळेल, अशी आशा आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदीचे उल्लंन केल्यास पर्यावरण रक्षण अधिनियमातील कलम १५ नुसार व संबंधित पालिकांच्या उपनियमानुसार दंड किंवा तुरुंगवासासह दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
हे वापरता येणार नाही -
इअरबड, प्लास्टिकचे झंडे, फुग्यांचे प्लास्टिक स्टिक्स, कॅन्डी स्टीक्स, आईस्क्रीम स्टिक्स, थर्मोकोल, प्लास्टिकच्या प्लेटस्, कप, ग्लास, काटा, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्यावर वापरला जाणारा प्लास्टिक पेपर, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटांच्या पॅकिंगसाठी वापरला जाणारा कागद आणि १०० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसीचे बॅनर आदींचा एकल वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे.