सिंगल्स बातम्या...

By Admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30

सोडत नव्याने घ्यावी

Singles news ... | सिंगल्स बातम्या...

सिंगल्स बातम्या...

googlenewsNext
डत नव्याने घ्यावी
औरंगाबाद : संजयनगर, मुकुंदवाडी या भागाची वॉर्ड रचना नैसर्गिकरीत्या अखंड असून, आतापर्यंत ती नैसर्गिक सीमांनुसार ठेवण्यात आली आहे. आरक्षण सोडतीत संजयनगरचे दोन तुकडे करण्यात आले असून, तोडलेले भाग जोडून आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे यांनी केली आहे.

-------------------------
भारतीय क्रांतिसेनेची श्रद्धांजली
औरंगाबाद : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनानिमित्त भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष राधेश्याम झलवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा घेण्यात आली.

श्रद्धांजली
औरंगाबाद : बहुजन युथ पँथरच्या वतीने आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उदकराम कांबळे, राहुल बनकर, चेतनानंद चौधरी, शेख कालू, आकाश त्रिभुवन, राजू मगरे, चौथमल, गुड्डू भोळे, अविनाश बनकर, जितेंद्र खरे, राहुल घुमरे, प्रकाश अहिरे आदींची उपस्थिती होती.
-----------------
सुरेवाडीतील प्रश्नांकडे मनपाचे दुर्लक्ष
औरंगाबाद : सुरेवाडीत मनपाचे दुर्लक्ष झाल्याने ड्रेनेज, रस्ते, पाणी, कचरा या समस्या सातत्याने भेडसावत आहेत. वॉर्डात अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने रात्र जागून काढावी लागत आहे. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अंधारात चोर्‍यामार्‍यांची भीती वाढली आहे. परिसरातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी संतोष राठोड, यादवराव गवारे, लक्ष्मण धोंडकर, राजू वाघ, बी.आर. पाटील, जाधव, विष्णू राऊत, पांचाळ, साळवे, वामन दळवी, सुरेश पवार, पैठणकर, प्रभू मानकापे, भोंडे, भवर आदींनी केली आहे.

--------------------
साबुदाणा खिचडी वाटप
औरंगाबाद : महाशिवरात्री उत्सवानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना विघ्नहर्ता क्रीडा मंडळातर्फे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी अजय चावरिया, ॲड. संतोष चव्हाण, सुभाष कवडे, सुभाष बनकर, शंकर ठाकूर, ॲड. चंद्रकांत पाटील, पिंटू कसारे, बबलू बरेटिया, गणेश सरसे, रोहित जावळे, सुनील मांडे, बाळू सरसे, लक्ष्मण राऊत, ऋषी देवतकर, अमोल खेडकर आदींची उपस्थिती होती.
--------------
झुंजार छावाची शिवजयंती समिती
औरंगाबाद : झुंजार छावाची दत्तात्रय घारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शिवजयंती उत्सव समिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष- बालाजी गिरी, कार्याध्यक्ष- मंगेश खरात, सचिव- विजय घुले, उपाध्यक्ष- प्रकाश हेंडगे, कोषाध्यक्ष- बालाजी दळवी, सहकोषाध्यक्ष- बी.व्ही. पोपळघट, सहसचिव- प्रशांत डावकर आदी.
-------------------

Web Title: Singles news ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.