सायन - पनवेल टोलवेजचा भोंगळ कारभार

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:15+5:302015-02-18T00:13:15+5:30

टोलचा भुर्दंड : स्थानिकांचे फ्रि पास इतरांना दिले

Sion - Polar Tollway Trail | सायन - पनवेल टोलवेजचा भोंगळ कारभार

सायन - पनवेल टोलवेजचा भोंगळ कारभार

Next
लचा भुर्दंड : स्थानिकांचे फ्रि पास इतरांना दिले
पनवेल : सायन - पनवेल महामार्गावर खारघर येथे सुरू झालेल्या टोल नाक्याजवळील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या बनत चालली आहे. यात आता पुन्हा एकदा टोलवेजचा भोंगळ कारभारही समोर आला आहे. स्थानिक रहिवाशांना टोल सवलतीसाठी दिल्या जाणार्‍या टॅग (पास) वाटपातील भोंगळ कारभार सुरू असल्याची प्रचिती आज एका वाहनचालकाला आली. एमएच ४६ या पासिंगच्या गाडीसाठी नोंदणी केलेला टॅग घेण्यासाठी गेलेल्या वाहनचालकाचा टॅग याठिकाणच्या कर्मचार्‍यांनी दुसर्‍याच गाडीला दिल्याने टोल प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
टोलवसुलीमध्ये वगळलेल्या पनवेल, कोपरा, खारघर, कळंबोली, कामोठेमधील वाहनांसाठी सायन - पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीने टोलमधून सूट देण्यासाठी संगणकीकृत टॅग वाटपाची योजना सुरू केली. दहा हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांनी दीडशे रुपये भरून हे टॅग आपल्या गाडीवर चिकटवून घेतले. दरम्यान, हे टॅग मिळविण्यासाठी तळोजा लिंक रोडजवळील उड्डाणपुलाखाली सायन - पनवेल टोलवेज प्रा. लि.ने सुरू केलेले कार्यालयात अजूनही टॅग देण्याचे काम करत आहेत. एमएच ४६, एन २२७७ या क्रमांकांच्या वाहनचालकाने १९ जानेवारी रोजी या टॅगसाठी या कार्यालयात अर्ज केला होता. हा टॅग घेण्यासाठी १७ फेब्रुवारी रोजी हे वाहनचालक आपल्या गाडीसह त्याठिकाणी गेले असताना तुमचा टॅग याठिकाणाहून गहाळ झाल्याचे सांगत टॅग कदाचित दुसर्‍या गाडीला चिकटविण्यात आला असावा, असे अर्धवट उत्तर देण्यात आले. कर्मचार्‍यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तराला कंटाळून झालेल्या प्रकाराबद्दल विरोध दर्शविल्यावर त्या अधिकार्‍यांनी नमती भूमिका घेतली व दिलेला टॅग ब्लॉक करता येईल, असे सांगत तुम्हाला दुसरा टॅग देण्याचे मान्य केले. या कार्यालयामध्ये अशा घटना यापूर्वी घडल्याची माहिती टॅग मिळविण्यासाठी आलेल्या इतर वाहनचालकांनी दिली.
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसावल्यानंतर टोल कंपनीने टॅगसाठी वाहनचालकांकडून आकारण्यात येत असलेले १५० रुपये आकारण्याचे बंद केले व टॅगसाठी स्थानिक रहिवाशांना सद्यस्थितीत मोफत टॅग देण्यात येत आहेत, मात्र यापूर्वी झालेली कायदाबाह्य दहा हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांच्या पैशाच्या वसुलीबद्दल काय? टोल प्रशासन त्यांना हे पैसे परत करणार आहे का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
-----
टोल प्रतिक्रिया
एका वाहनाचा टॅग दुसर्‍या वाहनाला लागणे शक्य नाही. आमचे कर्मचारी स्व:त याठिकाणी हजर राहून गाडीला हा टॅग लावतात. कागदपत्रांची कमतरता असल्यास टॅग मिळण्यास उशीर होऊ शकतो. झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- उमेश सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, एसपीटीपीएल
---

Web Title: Sion - Polar Tollway Trail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.