साहेब, पती बाथरुममध्ये जाऊन रोज...; पीएचडी दांम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 05:25 PM2023-09-18T17:25:08+5:302023-09-18T17:25:23+5:30

समुदेशकांनुसार पती-पत्नीवरील संशयाची अनेक प्रकरणे येत असतात. असेच आणखी एक प्रकरण आले आहे, पती पाचवी पास आहे

Sir, the husband goes to the bathroom every day...; The argument of the PhD couple reached the police station | साहेब, पती बाथरुममध्ये जाऊन रोज...; पीएचडी दांम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

साहेब, पती बाथरुममध्ये जाऊन रोज...; पीएचडी दांम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

googlenewsNext

पती-पत्नी कितीही शिक्षित असले तरी त्यांच्य़ात काही ना काही वाद सुरुच असतात. अनेकदा अनैतिक संबंधांवरून आरोप प्रत्यारोप केले जातात. असाच एक प्रकार आग्रा शहरात समोर आला आहे. दोन्ही पीएचडी झालेले, परंतू दोघांचेही अनैतिक संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

पत्नीने तिच्या पतीवर तो बाथरुममध्ये जाऊन त्याच्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल करत असल्याचा आरोप केला आहे. तर पतीने पत्नीचे एका प्राध्यापकाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. त्यांच्याच संशयाचा डोह एवढा खोल बनला आहे की आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. 

रविवारी समुपदेशकाकडे पोहोचलेल्या पतीने पत्नीचे एका प्राध्यापकाशी संबंध असल्याचे सांगितले आहे. तर पती वॉशरूममध्ये जातो आणि प्रेयसीला व्हिडिओ कॉल करतो, असे पत्नीने सांगितले आहे. आता त्यांच्यातील हा वाद पाहून समुपदेशकाने त्यांना पुढील तारीख दिली आहे.

समुदेशकांनुसार पती-पत्नीवरील संशयाची अनेक प्रकरणे येत असतात. असेच आणखी एक प्रकरण आले आहे, पती पाचवी पास आहे, तर पत्नी बीए झालेली. पतीच्या पगारात घरखर्च भागायचा. यामुळे पत्नीने मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमविण्यासाठी तीन तास एका कंपनीत सहाय्यकाची नोकरी पत्करली. ती एका खासगी शाळेत शिकवायलाही जाते. परंतू पती तिच्यावर संशय घेऊ लागला होता. 

समुपदेशनानंतर पतीने पुन्हा संशय घेणार नसल्याचे सांगितले, परंतू पत्नीने त्याच्यासमोर एक अट ठेवली. नवऱ्याने 15 दिवस आपली चूक मान्य करावी आणि सकाळ-संध्याकाळ फोन केला तरच ती सोबत राहण्यास जाईल, असे तिने सांगितले. पत्नीचा आग्रह पतीला मान्य करावा लागला.
 

Web Title: Sir, the husband goes to the bathroom every day...; The argument of the PhD couple reached the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.