सिसोदिया यांच्या वक्तव्याने खळबळ
By admin | Published: January 11, 2017 04:18 AM2017-01-11T04:18:04+5:302017-01-11T04:18:04+5:30
अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील, असे समजून मतदारांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन ‘आप’चे नेते
हरीश गुप्ता / नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील, असे समजून मतदारांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन ‘आप’चे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले खरे. पण त्यातून केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याचा अर्थ काहींनी काढल्यामुळे दिल्ली व पंजाबमध्ये काही काळ खळबळ माजली. काहींनी त्यावरून केजरीवाल यांच्यावर टीका केली.
मात्र केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार नसून, तेच मुख्यमंत्री असतील, असे समजून मते द्या, असे आवाहन केले होते, असे सिसोदिया यांना स्पष्ट करावे लागले. मोहालीच्या सभेत सभेत सिसोदिया आपच्या उमेदवारांना मते द्या, असे आवाहन करताना केलेले विधान अनेकांना संदिग्ध वाटले, तर काहींनी त्याचा थेट चुकीचाच अर्थ काढला. अकाली दल, भाजपा व काँग्रेस नेत्यांच्या भुवयाही उंचावल्या.
दिल्लीची मुख्यमंत्री असलेली हरिणायातील व्यक्ती पंजाबची मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते, असा सवाल पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी उपस्थित केला तर अरविंद केजरीवाल यांची अघोरी महत्त्वाकांक्षा उघड झाली. हीच का त्यांची इमानदारी, अशी टीका काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी केली.