सिस्टर निर्मला कालवश
By admin | Published: June 24, 2015 12:13 AM2015-06-24T00:13:12+5:302015-06-24T00:13:12+5:30
मदर टेरेसा यांच्यानंतर मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिस्टर निर्मला जोशी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
कोलकाता : मदर टेरेसा यांच्यानंतर मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिस्टर निर्मला जोशी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या अत्यवस्थ होत्या. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली, असे मिशनरीजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी मदर हाऊस येथे आणले जाणार असून संध्याकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मदर टेरेसा यांच्या निधनाच्या सहा महिन्यांपूर्वी १३ मार्च १९९७ रोजी निर्मला जोशी यांची मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या सुपीरियर जनरलपदी निवड झाली होती. एप्रिल २००९ मध्ये जनरल चॅप्टरच्या बैठकीत निर्मला यांच्यानंतर सिस्टर मेरी प्रेमा यांना सुपीरियर जनरल बनविण्याचा निर्णय झाला होता. (वृत्तसंस्था)