अगुस्ता-मल्ल्या चौकशीसाठी एसआयटी !
By admin | Published: June 10, 2016 05:42 AM2016-06-10T05:42:13+5:302016-06-10T05:42:13+5:30
मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन
नवी दिल्ली : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स घेण्याच्या सौद्यातील कथित भ्रटाचार आणि विजय मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून, राकेश अस्थाना तिचे प्रमुख असतील.
गोध्रा येथे २00२ साली साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळण्याच्या प्रकाराची चौकशीही राकेश अस्थाना यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात अगुस्ता वेस्टलँड आणि विजय मल्ल्या या दोन प्रकरणांचा तपास ही एसआयटी करणार असून, भविष्यात याच पथकाकडे आणखी काही प्रकरणे तपासासाठी सोपविली जाण्याची शक्यता आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे मिलानच्या न्यायालयाने म्हटल्यामुळे ती रक्कम कोणाला मिळाली, याचा तपास केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
>तपासासाठी मुदत नाही
किंगफिशर एअरलाइन्ससाठी बँकांकडून कोट्यवधींची कर्जे घेणारा आणि ती न फेडता परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्या याच्याकडून रक्कम कशी वसूल करता येईल, याचाही तपास व अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी एसआयटीची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र तपास कधीपर्यंत पूर्ण करायचे, यासाठी मुदत दिलेली नाही.