'ये बिक गई है गोर्मिंट', सीताराम येचुरींचं मोबाइल कव्हर सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 08:29 AM2017-10-30T08:29:24+5:302017-10-30T08:33:29+5:30
सीताराम येचुरी यांचं मोबाइल कव्हर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.
मुंबई- माजी राज्यसभा खासदार आणि कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी त्यांच्या आक्रमक स्वभाव आणि व्यंगात्मक टीकेसाठी नेहमीच चर्चेत असतात. पण आता सीताराम येचुरी यांचं मोबाइल कव्हर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे.
संसदेमध्ये तसंच संसदेच्या बाहेर अशा दोन्हीही ठिकाणी मोदी सरकारवर आक्रमकपणे टीका केल्याने आणि व्यंगासाठी सीताराम येचुरी नेहमीच चर्चेत असतात. पण आता सीताराम येचुरी यांच्या मोबाइलचं बॅक कव्हर अचानक चर्चेत आलं आहे.
मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सीताराम येचुरी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात येचुरी जेडीयूचे नेते शरद यादव यांच्याबरोबर स्टेजवर उपस्थित होते. यावेळी फोटो काढण्यासाठी सीताराम येचुरी यांनी त्यांचा मोबाइल फोटो काढण्यासाठी बाहेर काढला. त्यावेळी येचुरींचं मोबाइल कव्हर सगळ्यांच्या निदर्शनास आलं. सीताराम येचुरींच्या मोबाइल बॅककव्हरवर 'ये बिक गई है गोर्मिंट', असं कॅप्शन इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. सीताराम येचुरी यांचा मोबाइलबरोबरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर तसंत अनेक शहारांमध्ये आणि देशांमध्ये या घोषणचे पोस्टर्स लावण्यात आले होते. पण गेल्या अनेक महिन्यांपासून असे पोस्टर्स कुठेही दिसले नव्हते. काही महिन्यांनंतर सीताराम येचुरी यांच्या या मोबाइल कव्हरच्या निमित्ताने ही घोषणा पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा यावर चर्चा होते आहे.
मोबाइल कव्हरवर असं कॅप्शन ठेवण्याचा नेमका हेतू काय ? अशी विचारणा केल्यावर, मोबाइल कव्हरवरील कॅप्शन फक्त एक व्यंग असल्याचं सीताराम येचुरी यांनी म्हंटलं.
इंग्रजी भाषेत लिहीलेल्या या कॅप्शनमध्ये अनेक ठिकाणी स्पेलिंगच्या चुका आहे. पण तरीही या कॅप्शनची सोशल मीडियावर खूप चर्चा होते.