...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 03:28 PM2018-06-05T15:28:16+5:302018-06-05T15:28:16+5:30

जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. 

Sitaraman has warned in tough words about the infringement of arms and ammunition by Pakistan during the month of Ramzan | ...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

googlenewsNext

 नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. 

रमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत सीतारामन म्हणाल्या, "भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. पण आगळीक करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गृहमंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास ते नक्कीच प्रत्युत्तर देतील." 




यावेळी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत विचारणा केली असता सीतारामन यांनी सध्याच्या परिस्थितीत चर्चा होण्याची शक्यता फेटाळून लावली. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे." असे त्या म्हणाल्या. 



 रमजान काळात शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला का, अशी विचारणा केली असता सीतारामन म्हणाल्या, शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला किंवा नाही हे निश्चित करणे संरक्षण मंत्रालयाचे काम नाही. आच्या सीमांचे रक्षण करणे हे आमचे काम आहे आणि आम्हाला कुणी डिवचले तर आम्ही शांत राहणारा नाही. डिवचण्यासाठी केल्या गेलेल्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाईठ आम्हाला सज्ज राहिले पाहिजे. 




तसेच लष्कराकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची कमतरता नाही. तसेच राफेल करारामध्ये  भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही बिनबुडाचा आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.   



 

Web Title: Sitaraman has warned in tough words about the infringement of arms and ammunition by Pakistan during the month of Ramzan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.