दिल है की मानता नहीं! राँग नंबरवरून सुरू झाली लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 05:21 PM2023-06-15T17:21:36+5:302023-06-15T17:23:26+5:30
प्रियकर नीरज कुमार हा जीरादेईचा रहिवासी आहे. दीड वर्षांपासून दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतं.
बिहारच्या सिवानमध्ये प्रेयसीला गुपचूप भेटणं एका तरुणाला चांगलच महागात पडलं आहे. स्थानिक लोकांनी प्रियकर-प्रेयसीला भेटत असताना पकडून अवघ्या अडीचशे रुपयात लग्न लावून दिलं. हे संपूर्ण प्रकरण सिवान जिल्ह्यातील एमएच नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसरी खुर्द गावाशी संबंधित आहे. प्रियकर आणि प्रेयसीच्या लग्नाची ही बाब चर्चेचा विषय बनली आहे. प्रियकर नीरज कुमार हा जीरादेईचा रहिवासी आहे. दीड वर्षांपासून दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतं.
एमएच नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसरी खुर्दमध्ये प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. दोघे भेटत असताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. दोघांना पकडून बेदम मारहाण केली. गावातील काही लोक संतापले. स्थानिक जाणकार व लोकप्रतिनिधींनी दोघांनाही लोकांपासून वाचवलं आणि कुटुंबीयांना बोलावून घेतलं. यानंतर चर्चा झाली. दोन्ही पक्षांची संमती आणि प्रेमी युगुलाची संमती मिळाल्यानंतर अवघ्या 250 रुपयांत दोघांनी लग्न केले.
राँग नंबरवरून सुरू झालं प्रेमप्रकरण
जीरादेई गावातील रहिवासी दूधनाथ साह यांचा मुलगा नीरज कुमार आणि एमएच नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसरी खुर्द येथील रहिवासी सुनीता फोनवर बोलले, पुढे संवादाचं रुपांतर प्रेमात कधी झाले, हे दोघांनाही कळले नाही. गेले दीड वर्ष भेटीगाठी सुरू होत्या. यानंतर प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या गावी पोहोचला. याची माहिती परिसरातील ग्रामस्थांना समजली. यानंतर गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडलं.
दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू
विचारपूस केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. प्रियकर नीरजने सांगितले की, दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न केले. दोन्ही कुटुंबांची बदनामी होईल असे कोणतेही काम करणार नाही. देवाला साक्षी मानून लग्न केले. दोघांमध्ये सुमारे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते, असे प्रियकराने सांगितले. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.