सहा शाखा व्यवस्थापक बडतर्फ जिल्हा बॅँक अपहार: पावणे दोन कोटींच्या रकमांची हेराफेरी
By admin | Published: January 29, 2016 10:39 PM2016-01-29T22:39:54+5:302016-01-29T22:39:54+5:30
Next
>जळगाव : जिल्हा बॅँकेच्या चाळीसगाव, भडगाव व पारोळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या सहा शाखांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात सहा शाखा व्यवस्थापकांना बडतर्र्फ करण्यात आले आहे. त्यातील कजगाव शाखा वगळता अन्य ठिकाणच्या शाखा व्यवस्थापकांच्या अपहाराच्या रकमांची वसूली करण्यात आल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली. जिल्हा बॅँकेच्या खेडगाव नंदीचे ता. भडगाव,भोजे चिंचपुरे ता. पाचोरा, चाळीसगाव शाखा, उंदीरखेडे ता. पारोळा, कोळगाव ता.भडगाव, कजगाव ता.भडगाव या शाखांमध्ये २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधित सुमारे १ कोटी ७५ लाखांच्या वर अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी हा अपहार केल्याचे लेखा परीक्षणात उघडकीस आले होते. ----सर्वात मोठा अपहार खेडगाव शाखेतसहा शाखांमध्ये झालेल्या अपहारात खेडगाव नंदीचे शाखेत सर्वाधिक रकमेचा अपहार झाला आहे. शाखा व्यवस्थापक पंढरीनाथ पाटील याने सुमारे १ कोटी रुपयांची हेराफेरी केली आहे. भोजेे चिंचपूर शाखा व्यवस्थापक किशोर गरूड याने २९ लाख, चाळीसगाव शाखा व्यवस्थापक संदीप देशमुख याने ३८ लाख, उंदीरखेडे शाखा व्ययस्थापक रत्नाकर पाटील याने ४ लाख १० हजार, कोळगाव शाखा व्यवस्थापक जगदीप सपकाळे याने १ लाख ८८ हजार, कजगाव शाखा व्यवस्थापक प्रकाश चौधरी याने ३ लाख ९० हजारांचा अपहार केल्याचे २०१२-१३ व २०१३.१४ च्या लेखा परीक्षणात उघडकीस आले आहे. त्यामुळे या सहा अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बचत खात्यात हेराफेरी बॅँकेत बचत खाते असलेल्या खातेदारांच्या रकमा बनावट कागदपत्रे करून काढून घेणे, रकमांमध्ये शून्य वाढवून वाढलेली रक्कम खिशात घालणे असे प्रकार औरंगाबाद येथील ऑडिट कंपनी कैलास असोसिएट्सने उघडकीस आणला आहे. या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट अंकित कैलास अग्रवाल यांनी हा अपहार उघडकीस आणला. ------सहाजण बडतर्फ हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅँक प्रशासनाने गंभीर दखल घेत प्रथम वसुलीची प्रक्रिया सुरू केली. त्यात कजगाव शाखा वगळता अन्य शाखेच्या व्यवस्थापकांकडून अपहाराच्या रकमा वसूल करण्यात आल्या असल्याचे बॅँकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच या सहा शाखा व्यवस्थापकांना बडतर्फ करण्यात आले आहे.-----