VIDEO: आयसीयूमध्ये मृतदेह पडून, सर्व डॉक्टर फरार; नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:51 PM2021-05-06T14:51:10+5:302021-05-06T14:56:18+5:30
CoronaVirus News: हरयाणातील गुरुग्राममधील धक्कादायक घटना; रुग्णांच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
गुरुग्राम: दिल्लाच्या शेजारी असलेल्या सायबर सिटी गुरुग्राममध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये असलेल्या किर्ती रुग्णालयात एकाच रात्री ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन संपल्यानं रुग्ण दगावल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असताना, रुग्ण दगावत असताना डॉक्टरांनी पळ काढला.
मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ
किर्ती रुग्णालयात २० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील ६ जणांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले, त्यावेळी आयसीयूला कुलूप होतं आणि त्यातील कर्मचारी गायब होते. मात्र समोर आलेला व्हिडीओ जुना असून सध्याच्या परिस्थितीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.
This is murder. And cover up!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2021
My condolences to the families of the victims. pic.twitter.com/md3tNWp1bZ
बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...
गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये असलेल्या किर्ती रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. परिस्थिती बिकट असताना रात्री साडे दहाच्या सुमारास डॉक्टरांनी पळ काढला. त्यामुळे २० रुग्णांचा जीव संकटात सापडला. यापैकी ६ जणांचा प्राण गेला. रुग्णालयात गंभीर परिस्थिती असताना डॉक्टरांनी पळ काढल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. आप्तांच्या निधनाची माहिती समजताच नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यांनी पोलिसांना बोलावलं. मात्र पोलिसांनीदेखील काही डॉक्टरांना पळून जाऊ दिलं, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.