तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 02:14 PM2020-07-01T14:14:05+5:302020-07-01T14:34:39+5:30
तामिळनाडूच्या लिग्नाइट पावर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.
चेन्नई - तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. कुड्डालोर जिल्ह्यातील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन पॉवर प्लान्टमध्ये (Neyveli Lignite power plant) भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 17 हून अधिक लोक जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (1 जुलै) नेवेली पॉवर प्लान्टच्या स्टेज-2 मधील एका बॉयलरमध्ये स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. स्फोटामुळे परिसरात धुराचे वातावरण आहे. तसेच लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
#UPDATE - 6 dead & 17 injured in an explosion at a boiler of Neyveli lignite plant: M. Sree Abhinav, Cuddalore Superintendent of Police https://t.co/jtaOudE9P0
— ANI (@ANI) July 1, 2020
मंगळवारी आंध्र प्रदेशामधील विशाखापट्टणम देखील वायू गळतीमुळे हादरल्याची घटना समोर आली होती. औषधं तयार करणाऱ्या कंपनीत वायू गळती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशाखापट्टणममधील सैनोर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वायू गळती झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून यामध्ये बेंझिमिडाझोल हा विषारी वायू लीक झाला. त्याच दरम्यान कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना त्रास सुरू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण
'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं
मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं...
...अन् चिमुकल्याच्या मृतदेहाला कवटाळत पित्याचा आक्रोश, मन सुन्न करणारी घटना