व्हॉट्सअॅपमध्ये येणार 6 धमाकेदार फीचर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:33 PM2017-07-19T15:33:55+5:302017-07-19T15:33:55+5:30

सोशल मीडियामध्ये अग्रेसर असणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप ""व्हॉट्सअॅप"" वापरणं अधिक फायदेशीर व्हावं यासाठी वेळोवेळी व्हॉट्सअॅपने नवनवे फिचर्स आणले आहेत.

Six Explosive Factors That Will Come Into Whatsapp | व्हॉट्सअॅपमध्ये येणार 6 धमाकेदार फीचर्स

व्हॉट्सअॅपमध्ये येणार 6 धमाकेदार फीचर्स

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  सोशल मीडियामध्ये अग्रेसर असणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप ""व्हॉट्सअॅप"" वापरणं अधिक फायदेशीर व्हावं यासाठी वेळोवेळी व्हॉट्सअॅपने नवनवे फिचर्स आणले आहेत. आताही व्हॉट्सअॅप युजर्ससाठी लवकरच सहा नवीन फिसर्च घेऊन येणार आहे. पाहुया कसे असणार आहेत हे नवीन फिचर्स
 
फीचर 1 - व्हॉट्सअॅपमध्येच यू- ट्युब व्हिडीओ होणार प्ले
व्हॉट्सअॅपनं एक भन्नाट अशा नवीन फीचरचा समावेश केला. आयओएस बिटा व्हर्जनवर उपलब्ध होणा-या या फीचरमुळे आता व्हॉट्सअॅप चॅट विन्डोमध्ये यू-ट्यूबवरील व्हिडीओ प्ले करता येऊ शकणार आहे.  याआधी व्हॉट्सअपवर यूट्युब व्हिडीओची एखादी लिंक ओपन करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर वेगळी टॅब ओपन व्हायची. पण नव्या फिचरनुसार व्हॉट्सअॅप विंडोमध्येच युजर्सना व्हिडीओ पाहता येणार आहे. या फीचरसाठी चाचणी सुरू असून लवकरच हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये अपडेट होणार आहे. संबंधित व्हिडीओ युजर्सना फुल स्क्रीन करूनदेखील पाहता येणार आहेत. तसेच चॅट करता करतादेखील युजर्स ते व्हिडीओ पाहू शकणार आहेत.  
 
फीचर 2 - यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहार 
लाखों व्हॉट्स अॅप युजर्संना UPI (Unified Payment Interface) हे पूर्णतः नवीन असे फीचर मिळणार आहे. या फीचरद्वारे कोणत्याही त्रासाविना, समस्येविना आर्थिक व्यवहार करणं शक्य होणार आहे.  UPI फीचरसंदर्भात सरकारसोबत कंपनीची बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. 
 
आणखी बातम्या वाचा
 
फीचर 3 - मेसेज रिकॉल फीचर
"रिकॉल" या फिचरद्वारे 5 मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज परत मिळवण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची संधी आता व्हॉट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.  आपण आपल्या मित्रांना किंवा ग्रुपमध्ये कोणताही मेसेज, फाइल किंवा ऑडिओ मेसेज सोबतच व्हिडीओ कॉलही करतो.
 
एखादा मेसेज पाठवल्यावर हा मेसेज पाठवून आपण चुकी केली असं तुम्हाला कधी तरी वाटलं असेल, किंवा एखादा मेसेज तुम्ही चुकीच्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर पाठवला असेल. पण एकदा मेसेज गेला की तुम्हाला काहीच करता येत नाही. मात्र, आता लवकरच यासाठी व्हाट्सअॅप रिकॉल हे फीचर अॅड करणार आहे. कोणत्याही मेसेजला काही सेकंदांसाठी टच केल्यास स्क्रीनवर रिकॉल हे ऑप्शन येईल. याद्वारे तुम्ही तो मेसेज  डिलीट करू शकतात. 
 
तुम्ही तो डिलीट केल्यास मेसेज सेंड केलेल्या व्यक्तीस मेसेज रिव्होक करण्यात आला आहे असा मेसेज दिसेल. मात्र, ग्रुप चॅटवर तुम्ही हे फीचर वापरू शकतात की नाही हे अजून स्पष्ट नाही. काही महिन्यापूर्वी व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरू करणा-या व्हॉट्सअॅपचं हे सर्वात महत्त्वाचं फीचर असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय व्हॉट्सअॅप बिझनेस युजर्ससाठी एक खास अॅप डेव्हलप करण्यावरही काम करत असल्याचं वृत्त आहे. व्‍हाट्सअॅप फॉर बिझनेस असं या अॅपचं नाव असण्याची शक्यता आहे.
 
फीचर 4 - लाइव्ह लोकेशन शेअरिंग 
या फीचरद्वारे तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत तुम्ही ज्याठिकाणी आहात तेथील रिअल टाइम लोकेशन (ठिकाण व तेथील स्थानिक वेळ) शेअर करायचे आहे, तो क्रमांक निवडावे. चॅट बॉक्ससोबत येणा-या क्लिप आयकनवर क्लिक करा व लोकेशनवर टॅप  करा. यानंतर तुम्हाला ठिकाणाचा मॅप दिसेल. यावरील दर्शवण्यात आलेली वेळ व ठिकाणावर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती युजर्संना मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करता येणार आहे. ही माहिती तुम्ही 15 मिनिटं, एक तास, चार तास व त्याहून अधिक काळासाठीही ठेऊ शकता. जो कालावधी तुम्ही निवडला, त्यानुसार तुमचे लाइव्ह लोकेशन निवडलेल्या कॉन्टॅक्ससोबत शेअर होत जाणार.
 
फीचर 5 - फोन क्रमांक बदलल्याची माहिती
पूर्वी मोबाइल क्रमांक बदलल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मेसेज किंवा फोन करुन सांगावे लागत होते. मात्र आता ही कटकट लवकरच संपणार आहे. कारण मोबाइल क्रमांक बदलल्यानंतर आपोआपच मोबाइलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना नंबर बदलल्याची माहिती या फीचरमुळे मिळणार आहे. 
 
फीचर 6 - एडिट ""सेन्ट"" मेसेज
मेसेज रिकॉल फीचरनंतर हे फीचरदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एखादा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पुन्हा टेक्स्ट एडिट करायचे असेल तर ते लवकरच शक्य होणार आहे. पाठवलेल्या टेक्स्टमधील तुम्हाला हवा असलेल्या शब्दांमध्ये बदल करणं शक्य होणार आहे.  
 

Web Title: Six Explosive Factors That Will Come Into Whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.