काश्मीरमध्ये सहा जवान शहीद

By admin | Published: February 22, 2016 01:48 AM2016-02-22T01:48:10+5:302016-02-22T01:48:10+5:30

श्रीनगरच्या सीमेवरील पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत दडून बसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांसोबत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण चकमकीत रविवारी लष्कराच्या दोन

Six jawans martyred in Kashmir | काश्मीरमध्ये सहा जवान शहीद

काश्मीरमध्ये सहा जवान शहीद

Next

श्रीनगर : श्रीनगरच्या सीमेवरील पाम्पोर येथे एका शासकीय इमारतीत दडून बसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांसोबत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण चकमकीत रविवारी लष्कराच्या दोन कॅप्टनसह तीन कमांडर शहीद झाले, तर इमारतीत लपलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या चकमकीतील मृत्युसंख्या सातवर पोहोचली आहे.
कॅप्टन पवन कुमार, कॅप्टन तुषार महाजन आणि जवान ओमप्रकाश अशी रविवारच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात लष्कराला यश आले. कॅप्टन पवन कुमार हे हरियाणाचे तर कॅप्टन तुषार महाजन हे उधमपूरचे आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी दुपारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर या इमारतीचा ताबा घेतला होता. या हल्ल्यात दोन जवान आणि एक नागरिक असे तिघे जण ठार आणि नऊ जवान जखमी झाले होते. तत्पूर्वी सुरक्षा दलांनी या इमारतीत अडकलेल्या शंभरावर कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले होते. हे दहशतवादी शस्त्रसज्ज असल्याने कारवाई आणखी
काही काळ चालण्याची शक्यता
आहे. (वृत्तसंस्था)

दोन दिवसांपासून चकमक सुरूच
पाम्पोर येथे असलेल्या एंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाच्या या बहुमजली इमारतीत शनिवारी हे दहशतवादी घुसले होते. त्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराने कारवाई सुरू केली आहे. इमारतीत तीन ते चार दहशतवादी लपले असल्याचा अंदाज आहे. त्यांच्यासोबत रविवारीही भीषण चकमक उडाली, ज्यात भारतीय लष्कराचे तीन कमांडर शहीद झाले. ही चकमक सुरू असताना या इमारतीत आगही लागली.

दुसऱ्या दिवशीही रात्रीपर्यंत चकमक सुरूच होती. सुरक्षा दलांनी या संपूर्ण इमारतीला वेढा घातलेला आहे आणि जवान या इमारतीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. दहशतवाद्यांनी गोळीबारासोबतच सुरक्षा दलांच्या जवानांवर हातबॉम्बही फेकले.

Web Title: Six jawans martyred in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.