नक्षली हल्ल्यात सहा जवान शहीद

By admin | Published: April 14, 2015 02:40 AM2015-04-14T02:40:41+5:302015-04-14T02:40:41+5:30

नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये तीन दिवसांत चार हल्ले करून नक्षल्यांनी सुरक्षा दलाला हादरवून टाकले आहे. सोमवारी दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचे एक भूसुरुंगरोधी वाहन स्फोटात उडविले.

Six jawans martyred in Naxal attack | नक्षली हल्ल्यात सहा जवान शहीद

नक्षली हल्ल्यात सहा जवान शहीद

Next

आठ जण जखमी : हिंसाचाराने छत्तीसगड
हादरले; सलग तीन दिवसांत चौथ्यांदा हल्ला

रायपूर : नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये तीन दिवसांत चार हल्ले करून नक्षल्यांनी सुरक्षा दलाला हादरवून टाकले आहे. सोमवारी दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचे एक भूसुरुंगरोधी वाहन स्फोटात उडविले. या हल्ल्यात पाच जवान शहीद, तर आठ जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर रविवारी रात्री उशिरा कांकेर जिल्ह्यात नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. त्याच वेळी नक्षल हल्ल्यात बलिदान देणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
दंतेवाडा जिल्ह्यात चोलनार ते किरंदुल मार्गावर नक्षल्यांनी पोलिसांचे वाहन उडविले. या वाहनातून छत्तीसगड पोलिसांचे ११ जवान प्रवास करीत होते. चोलनार किरंदुल मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरूआहे. तेथील सुरक्षेकरिता हे जवान तैनात करण्यात आले होते. तत्पूर्वी रविवारी रात्री उशिरा नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी छोटे बेठिया येथील बीएसएफच्या छावणीवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हेड कॉन्स्टेबल रमेशकुमार सोळंकी शहीद झाले. सुरक्षा दलासोबत काही काळ झालेल्या चकमकीनंतर नक्षल्यांनी जंगलात पोबारा केला. (वृत्तसंस्था)

शनिवारी बस्तर क्षेत्रातील सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांच्या हल्ल्यात
एसटीएफचे सात जवान शहीद, तर १२ जखमी झाले होते.
रविवारी नक्षल्यांनी कांकेर जिल्ह्यातील १७ गाड्यांना आग लावली होती.
बालाघाटात एक अटकेत
बालाघाट : महाराष्ट्र पोलिसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेला बदरू तथा कृष्णा (२६) हा नक्षलवादी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात धिरी मुरम वनक्षेत्रात पोलिसांनी जेरबंद केला.

Web Title: Six jawans martyred in Naxal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.